Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अयशस्वी झाल्या तर मला खूप आनंद होईल आणि त्या यशस्वी झाल्या तर, मला वाईट वाटेल, अशी विकृत गरळ ओकणाऱ्या कॉंग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर यांचे नक्कीच डोके फिरलेले दिसते. राष्ट्रकुल खेळ संयोजन समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांच्या द्वेषाने पछाडलेल्या अय्यर यांनी, राजधानी दिल्लीत केलेल्या या थयथयाटामुळे केंद्र आणि दिल्ली सरकारची, कॉंग्रेस पक्षाचीही बेअब्रू झाली.

Friday, July 30, 2010 AT 01:37 AM (IST)

महागाईच्या कराल वणव्यात होरपळलेली गोरगरीब आणि सामान्य जनता दोन वेळच्या अन्नाला मोताद झाली असताना,    केेेंद्र सरकारने उघड्यावर ठेवलेले हजारो मेट्रिक टन धान्य सडून, कुजून जाते, ही बाब संतापजनक आणि गरीबांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे. गेली काही वर्षे केंद्र सरकारच्या मालकीच्या भारतीय खाद्य निगम या संस्थेच्या कोठारातील हजारो मेट्रिक टन धान्य सडून जात असल्याच्या घटना उजेडात आल्या होत्या.

Thursday, July 29, 2010 AT 02:34 AM (IST)

हिंदकेसरी पहिलवान मारुती माने यांच्या निधनाने तरुण मल्लांचा आणि महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राचा भक्कम आधारवड कोसळला आहे. मारुती माने सांगली शहराजवळच्या कवठे पिरानचे! गावातल्याच तांबड्या मातीत कुस्ती खेळता खेळता त्यांनी दररोज बारा तास व्यायाम आणि कुस्तीची मेहनत घेतली. पारंपरिक मातीच्या कुस्तीबरोबरच आधुनिक गादीवरच्या कुस्तीचाही त्यांनी जाणीवपूर्वक सराव केला.

Wednesday, July 28, 2010 AT 01:05 AM (IST)

गुजरातचे गृहखात्याचे माजी राज्यमंत्री अमित शाह यांना सोहराबुद्दीन खून प्रकरणी सीबीआयने अटक केल्यावर, भारतीय जनता पक्षाने सुरु केेलेला राजकीय तमाशाचा खेळ चालणार नाही. 2005 मध्ये सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी या दोघांचाही गुजरातच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाह यांच्या आदेशानेच खोटी चकमक घडवून खूून केल्याचा आरोप, सीबीआयने न्यायालयात ठेवताच, भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Monday, July 26, 2010 AT 11:14 PM (IST)

गुजरातचे विकास पुरुष मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी आणि माजी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सीबीआयने खून, खंडण्या, अपहरण, वसुली असे विविध आरोप ठेवल्यामुळे, भारतीय जनता पक्षाची स्वच्छ आणि निष्कलंक राजकारणाची ढोंगबाजी अखेर चव्हाट्यावर आली.

Sunday, July 25, 2010 AT 08:20 PM (IST)

क्रिकेटच्या फिरकी गोलंदाजीचा जादूगार मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमधील 800 वा बळी घेत, क्रिकेटच्या इतिहासात जागतिक विक्रम केला आणि श्रीलंकेतल्या गॉल स्टेडियममधल्या हजारो क्रिकेटरसिकांनी जल्लोष केला. भारत विरुध्द श्रीलंका कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमधून आपण निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. यश आणि लोकप्रियतेचे एव्हरेस्ट गाठल्यावर, तेथून तात्काळ खाली उतरायचे असते.

Saturday, July 24, 2010 AT 01:11 AM (IST)

लोकशाहीच्या रक्षकांनीच लोकशाहीचा पवित्र मंदिरात बिहारच्या विधानसभेत राजरोसपणे दिवसाढवळ्या खून केला.    मंदिराचे पुजारीच असे ठग, पेंढारी आणि गारदी झाल्यावर, त्या देवतेचे पावित्र्य राहणार तरी कसे? मंगळवारी आणि बुधवारी बिहारच्या विधानसभेत जे काही घडले, ते अत्यंत संतापजनक आणि लोकशाहीच्या परंपरेला डांबर फासणारे आहे.

Thursday, July 22, 2010 AT 11:51 PM (IST)

आंध्रप्रदेशातल्या जनतेत सवंग लोकप्रियता मिळवायसाठीच महाराष्ट्रातल्या बाभळी धरणावर धडक द्यायसाठी आलेल्या, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंचा पाच दिवस चाललेला धिंगाणा आणि राजकीय तमाशा अखेर संपला! जमावबंदी मोडून अशांतता निर्माण केल्याबद्दलचे त्यांच्यावर दाखल केलेले सर्व आरोप राज्य सरकारने न्यायालयात मागे घेऊन त्यांचा तमाशाचा फड मोडून टाकायची पूर्वतयारी केली.

Thursday, July 22, 2010 AT 01:46 AM (IST)

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी। प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे। त्रिभुवनी समर्थ एैसे पै तीर्थ। दक्षिणमुख वाहते चंद्रभागा। सकल संतांचा मुगुटमणी देखा। पुंडलिक सखा आहे तेथे। चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी। भोळ्या भाविकांसी अखंडित।।    आज आषाढ शुद्ध एकादशी. चंद्रभागेच्या वाळवंटी आणि भूलोकीचे वैकुंठ पंढरीनगरीत लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा अथांग जनसागर लोटला आहे.

Wednesday, July 21, 2010 AT 12:44 AM (IST)

पश्चिम बंगालमधल्या सैंथिया रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या प्रवासी रेल्वे गाडीवर पाठीमागून आलेल्या प्रवासी रेल्वे गाडीने जोरदार धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघातात 80 हून अधिक जणांचे बळी गेले, ते मानवी चुकीमुळेच! अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी रेल्वेचे रुळ उखडल्यामुळे मिदनापूर जिल्ह्यात ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रेल्वे रुळावरुन  घसरल्यामुळे झालेल्या अपघातात शंभर लोक ठार झाले होते.

Tuesday, July 20, 2010 AT 01:32 AM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: