Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  साप्ताहिक भविष्य (सूर्य रास)
मेष (मार्च २१ - एप्रिल २०)
खरेदी विक्री वाढेल रवी बुध दहावे. खरेदी विक्रीचे व्यवहार वाढतील. वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील. संगीत गायनवादनादि कलांचा आस्वाद घ्याल. ऐष करण्याकडे प्रवृत्ती राहील. जोखमीची कामे काळजीपूर्वक करा. सप्ताहाची सुरुवात गाठीभेटी घेण्यात धावपळीत जाईल. एक दोन दिवस थकवा जाणवेल. संततीच्या अडीअडचणी जाणून घ्याल. सप्ताहाचे शेवटी कामे वाढतील. वाद टाळा. अनुकूल दिनांक : 5, 11.
वृषभ (एप्रिल २१ - मे २१)
प्रशिक्षणासाठी निवड रवी बुध नववे. प्रशिक्षणासाठी निवड होईल. परदेशगमन घडेल. स्थावर प्रॉपर्टी, फ्लॅटच्या कामांना गती येईल. पोटाच्या तक्रारीकडे लक्ष द्या. पती पत्नीत मधून मधून खटके उडणे शक्य आहे. थोर व्यक्तींचा अनादर होऊ देऊ नका. सप्ताहात सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा भागवा. पत्रव्यवहार करा. गाठीभेटी घ्या. एक दोन दिवस शारीरिक तक्रारी, थकवा जाणवेल. सप्ताहाचे शेवटी अभ्यासाचा आढावा घ्या. अनुकूल दिनांक : 6, 7, 8.
मिथुन (मे २२ - जून २१)
धंद्यात मंदी रवी, बुध आठवे. धंदा व्यवसायात मंदी जाणवेल. भावंडांशी वाद संभवतात. थोडी आशा निराशा जाणवेल. पण आर्थिक प्राप्ती होत राहील. आध्यात्मिक बाबीत प्रगती होईल. शारीरिक त्रास राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साही रहाल. कौटुंबिक बाबी, गरजा इ. साठी पैसा उपलब्ध होईल. पत्र व्यवहार, गाठीभेटी, प्रवास इ. साठी झालेल्या धावपळीने सप्ताहाच्या शेवटी थकवा जाणवेल. अनुकूल दिनांक : 5, 9, 10.
कर्क (जून २२ - जुलै २२)
सरकारी कामासाठी खर्च रवी बुध सातवे. सरकारी कामासाठी खर्च होईल. कामासाठी प्रवास घडेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. अहमपणा जरा दूर ठेवणेच हिताचे राहील. तसा तुमच्या कामाची छाप इतरांच्यावर पडू शकेल. सप्ताहाची सुरूवात खर्चिक, कंटाळवाणी होईल. रेंगाळलेली कामे एक दोन दिवसात पूर्ण कराल. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्याल. सप्ताहाच्या शेवटी प्रवास, गाठीभेटी इ. साठी खूप धावपळ होईल. अनुकूल दिनांक : 6, 7, 8, 11.
सिंह (जुलै २३ - ऑगस्ट २१)
कामे यशस्वी होतील रवी बुध सहावे. बुध्दिचातुर्याने कामे यशस्वी होतील. नवीन कल्पना सुचतील. नवीन दर्जा मिळेल. नवीन रोजगार मिळेल. विवाह जुळतील. शारीरिक सौख्य मात्र कमी लाभेल. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक प्राप्ती चांगली होईल. एक दोन दिवस खर्चाचे कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे पुढील दोन दिवसात पूर्ण करु शकाल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबात रमाल. अनुकूल दिनांक : 5, 9, 10
कन्या (ऑगस्ट २२ - सप्टेंबर २३)
बोलताना जिभेला लगाम घाला रवी बुध पाचवे. संततीचे उपदव्याप त्रासदायक वाटतील. मनाची थोडी कुचंबणा होईल. बोलताना जिभेला लगाम घाला. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. यशाची खात्री नसेल. सप्ताहाच्या सुरूवातीला धंद्यात, नोकरीत महत्वाच्या घटना घडतील. कामाचा मोबदला मिळेल. एक दोन दिवस आर्थिक अडचणीत आणणारे असतील. सप्ताहाच्या शेवटी उत्साह वाढेल. अनुकूल दिनांक : 5, 6, 7, 8, 11.
तूळ (सप्टेंबर २४ - ऑक्टोबर २३)
घरातील वृध्दांची काळजी रवी बुध चवथे. घरातील वृध्दांची काळजी राहील. नातेवाईकांच्यावर विसंबून कामे होणार नाहीत. भावंडांशी वाद संभवतात. संततीच्या अडचणी असतील. कुटुंबात अशांतता अनुभवाल. तुमचे काम मात्र इतरांच्यावर प्रभाव टाकणारे राहील. सप्ताहाच्या सुरूवातीला कामाचे नियोजन करा. त्याप्रमाणे कार्यवाही करा व कामाचा मोबदला मिळवा. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक अडचणीत याल. कामाचा कंटाळा असेल. अनुकूल दिनांक : 6, 7, 8, 9.
वृश्चिक (ऑक्टोबर २४ - नोव्हेंबर २२)
प्रयत्नशील रहाल रवी बुध तिसरे. धंदा व्यवसायाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहाल. कामे यशस्वी होतील. पण प्रयत्न अपुरे पडत असल्याची जाणीव होईल. संततीला त्रास संभवतो. नोकर चाकराकडून फसवणूक शक्य. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रकृती नरमगरम राहील. कामाचे नियोजन करा. त्याप्रमाणे कार्यवाही करून सप्ताहाच्या शेवटी कामाचा मोबदला मिळू शकेल. अनुकूल दिनांक : 9, 10, 11.
धनु (नोव्हेंबर २३ - डिसेंबर २२)
आर्थिक प्राप्ती चांगली रवी बुध दुसरे. तुमच्या कर्माला नशिबाची साथ लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. पण लॉटरीसारख्या मार्गाने होणार नाही. घरात तुमचे लाड होतील. सरकारी कामातून अर्थप्राप्ती होऊ शकेल. विवाह जुळतील. नवीन घर, वाहन घ्याल. सप्ताहाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण लाभेल. एक दोन दिवस सर्दी पडसे थकवा राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कार्य साफल्याचा आनंद मिळेल. अनुकूल दिनांक : 5, 11.
मकर (डिसेंबर २३ - जानेवारी २०)
धंदा व्यवसायात चैतन्य आणाल रवी बुध तुमच्या राशीत. धंदा व्यवसायात नवीन कल्पना वापरून चैतन्य आणाल. आरोग्याची तक्रार मात्र राहू शकेल. खूप थकेपर्यंत काम करत रहाल. नोकरीत अधिक जबाबदारी राहील. मित्रांकडून फसवणूक होणे शक्य आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे वाढतील. वाद टाळा. अपेक्षित सहकार्य उशिरा मिळेल. एक दोन दिवस सर्दी पडसे थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी समजेल. अनुकूल दिनांक : 5, 6, 7, 8.
कुंभ (जानेवारी २१ - फेबृवारी १९)
वरिष्ठांची नाराजी रवी बुध बारावे. मोठे खर्च निघतील. वरिष्ठ, मित्र यांची नाराजी ओढवून घ्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. प्रेमिकांना विवाहासाठी सध्या तरी विरोध होण्याची शक्यता आहे. कामात अडचणी येतील. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. कामाचा व्याप वाढेल. वाद टाळा. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. सप्ताहाच्या शेवटी सर्दी पडसे थकवा जाणवेल. अनुकूल दिनांक : 6, 7, 8, 9, 10
मीन (फेबृवारी २० - मार्च २०)
आर्थिक लाभ रवी बुध अकरावे. आर्थिक लाभ होतील. थोर व्यक्तींचे सान्निध्य लाभेल. हौसमौज करायला पैसा उपलब्ध होईल. धंदा व्यवसाय नोकरीत अडखळल्यासारखे होईल. विपरीत बुध्दी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थकवा जाणवेल. हाऊस किपिंगकडे लक्ष राहील. संततीचा सहवास लाभेल. कामाचा व्याप वाढेल. वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी इतरांच्या सहकार्याचे कामे होतील. अनुकूल दिनांक : 9, 10, 11.
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: