Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 79
घटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. कोणताही गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी अंतिम निवाडा होईपर्यंत आरोपीला जामीन दिला जातोे. त्यासाठी गुन्ह्यांचे जामीनपात्र आणि अजामीनपात्र या दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. जामिनाचा निर्णय देताना उच्च आणि सत्र न्यायालयांमध्ये विसंगती आढळते. ही विसंगती वेळीच टाळायला हवी. इंडियन पिनल कोडमध्ये गुन्ह्यांचे जामीनपात्र आणि अजामीनपात्र अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. अशी विभागणी करण्यामागे कायदेतज्ज्ञांचा हेतू समाजहिताबरोबर आरोपीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा आहे. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार न मानता सामान्य माणसाचाच दर्जा द्यावा अशी तरतूद कायद्यात आहे. आरोपाचे गांभिर्य पाहून त्याची सिद्धता होईपर्यंत आरोपीला दोषी किंवा गुन्हेगार म्हणून वागणूक दिली जाऊ नये हे तत्व कायद्यामध्ये फार पूर्वीपासून पाळले गेले. कायद्यातील गुन्ह्यांच्या वर्गीकरणातून आजही याची प्रचिती येते.
Thursday, September 09, 2010 AT 09:06 AM (IST)
  बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पास्वान यांची आघाडी, नितीशकुमार -भाजपची युती आणि कॉंग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे. अखेर एकदाची बिहारमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुका तिरंगी होणार आहेतच पण, या त्रिकोणातील प्रत्येक पक्ष आणि आघाडी आपल्या परीने एका निर्णायक अवस्थेत असून जणू सत्त्वपरीक्षा देत आहे. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांनी या राज्याच्या सामाजिक जीवनाची रबडी करून टाकली होती. त्यामुळे बिहारची प्रतिमा डागाळली होती. लालूप्रणित जंगलराज संपवणे अगत्याचे आहे असे मागील निवडणुकीत जनतेला वाटले आणि एका विशिष्ट अवस्थेत जनता दल (अ) आणि भाजपा यांच्या आघाडीच्या हाती बिहारची सत्ता आली. भाजपप्रणित आघाडी मोडीत निघत आहे असे चित्र निर्माण होत असतानाच बिहारमध्ये मात्र ती सत्तेवर आली आहे. या आघाडीने बिहारमधले लालूराज संपवण्याचे वचन जनतेला दिले होते.
Wednesday, September 08, 2010 AT 10:36 AM (IST)
  बेटिंग आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाने संपूर्ण क्रिकेटविश्व ढवळून निघाले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भात रोज नवनवीन माहिती प्रसिध्द होत आहे. अशा परिस्थितीत बेटिंग कसे चालते, फिक्सिंग म्हणजे काय, याची भरपूर उत्सुकता पहायला मिळत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीबरोबरच एकूणच क्रिकेटविश्वाबद्दल शंकास्पद परिस्थिती निर्माण करणाऱ्या बेटिंगविश्वाचा खास वेध. "आयपीएलमध्ये मुंबई, हैद्राबाद, चैन्नई, दिल्ली, पंजाब, बंगळुरु, राजस्थान, कोलकाता असे देशाच्या विविध शहरे आणि राज्याचे संघ आहेत. आता पुणे आणि कोची या शहरांच्या संघाचाही त्यात समावेश होत आहे. मग नेमका गुजरातचाच संघ कसा नाही? सगळेच क्रिकेट खेळले तर सट्टा कोण लावणार? असा गुजराथी एसएमएस मध्यंतरी चर्चेत होता. क्रिकेटवर सट्टा लावला जातो ही बाब अगदी सामान्य झाल्याचेच हे निदर्शक आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावण्याची "प्रथा' फार पूर्वीपासून प्रचलित आहे. पण पूर्वी हे सट्टेबाज इनामदारीने व्यवसाय करत. म्हणजे दोन संघांपैकी कमकुवत संघावर पैसे लावले तर "परतावा' अधिक मिळे. (अजूनही मिळतो) आणि बलाढ्य संघावर पैसे लावले तर कमी "परतावा' मिळे.
Tuesday, September 07, 2010 AT 10:44 AM (IST)
कोल्हापूर वार्तापत्र राजीव वाबळे देशातील पर्यटन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या केसरी टूर्सच्या कार्यकारी संचालिका वीणा पाटील यांनी कोल्हापूर भेटीचेवेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पर्यटनप्रेमी यांच्या बरोबर मनमोकळेपणाने, दिलखुलास संवाद साधला. मलेशियासारखा महाराष्ट्राच्या आकारमानाचा देश पर्यटन क्षेत्रात मोठी मजल, उंची गाठू शकतो. मात्र भारतामध्ये पर्यटन वृध्दीसाठी मुख्यत्वे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. तो दूर झाल्यास यंदाच्या पर्यटन वर्षामध्ये आपला देशही भरीव पावले टाकू शकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाचे वर्ष "पर्यटन वर्ष' असल्याची घोषणा मुख्यमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी केली आहे, ही चांगली बाब आहे. या वर्षामध्ये आगामी केवळ पाच वर्षांचा विचार न करता पुढील पन्नास वर्षांचा पर्यटन विकासाचा आराखडा निश्चित करुन त्यादृष्टीने कृतिशील पावले टाकली पाहिजेत. धरसोड वृत्ती सोडून, निश्चयाचे संकल्प आराखडा परिपूर्तीसाठी झटले पाहिजे. असंख्य पर्यटनस्थळे सध्या उपलब्ध आहेत. पण त्यांचा विकास झालेला नाही.
Saturday, September 04, 2010 AT 10:28 AM (IST)
  क्रिकेटमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरेल एवढे मोठे मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सच्चा क्रिकेटप्रेमीही या खेळापासून दूर जाईल. समोर आलेली माहिती किरकोळ वाटावी एवढी माहिती रोज बाहेर येत आहे. पैशासाठी काही खेळाडू देश आणि खेळाची विक्री करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. खेळ वाचवायचा असेल तर स्वार्थाने लडबडलेली ही पिल्लावळ वेळीच ठेचून काढायला हवी. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्‌स येथे झालेल्या कसोटी सामन्यात मजहर माजिद या पाकिस्तानी सट्टेबाजाकडून मोठी रक्कम घेऊन स्पॉट फिक्सिंग केले हे उघडकीस आल्यावर संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडाली. ही कसोटी पाकिस्तान मोठ्या फरकाने हरल्यामुळे पाकिस्तानी चाहते आधीच नाराज होते. त्यात मॅच फिक्सिंग उघडकीस आल्यावर त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान, रमीझ राजा आणि जावेद मियॉंदाद यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करताना क्रिकेटपटूंवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर आयुष्यभराची बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली. इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींनी तर पाकिस्तान क्रिकेटवरच आंतरराष्ट्रीय बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली.
Friday, September 03, 2010 AT 08:15 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: