|
|
|
Total Results: 571
|
|
|
|
|
दुबई, दि. 18 (वृत्तसंस्था) : एलजी आयसीसी पुरस्कार 2010 ची घोषणा 6 ऑक्टोबर रोजी बंगलोर येथे होणार असून त्यासाठी निवडण्यात आलेल्या 8 खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना नामांकने देण्यात आली आहेत. चार संघांच्या आठ खेळाडूंना तीन-तीन वर्गामध्ये सहभागी करण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, जॅक कॅलिस, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, डग बोलिंजर आणि श्रीलंकेचा महेला जयवर्धने यांनाही नामांकने देण्यात आली आहेत.
Thursday, August 19, 2010 AT 09:37 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लंडन, दि. 18 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने इंग्लंडच्या संघाने मोठी तयारी केली खरी पण, बुधवारपासून येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाची भोजन वेळेपर्यंतच दाणादाण उडाली. पाकिस्तानकडून पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या वहाब रियाज या जलदगती गोलंदाजाने एका-मागोमाग धक्के देत इंग्लंडची स्थिती 5 बाद 67 अशी दयनीय अवस्था केली. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने सावध सुरुवात केली असतानाच, ऍलिस्टर कुक (6 धावा), कर्णधार अण्ड्र्यू स्ट्रॉस (15 धावा), जोनाथन ट्रॉट (12 धावा), केविन पीटरसन (6 धावा) आणि पॉल कॉलिंगवुड (5 धावा) अशा सलामीच्या प्रमुख फलंदाजांना गमावले.  इंग्लंड संघाने भोजन वेळेपर्यंत 24 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात कशाबशा 69 धावा जमवल्या होत्या. पाकिस्तानकडून कसोटी कारकिर्दीस सुरुवात करीत असलेल्या वहाब रियाजने शानदार प्रदर्शन करीत तीन गड्यांना तर मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमेरने प्रत्येकी एका गड्याला तंबूत धाडले.
Thursday, August 19, 2010 AT 09:36 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सूरज रणदिववर एका सामन्याची बंदी दिलशानला सामन्याच्या मानधनाचा दंड कोलंबो, दि. 18 : भारतीय संघाला विजयासाठी आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला शतकासाठी एका धावेची गरज असताना, जाणूनबुजून नो बॉल टाकण्याच्या कृत्यामुळे साऱ्या क्रिकेट जगतातून टीकेचा लक्ष्य ठरलेल्या श्रीलंका संघाला या वादळापासून वाचवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अखेर हे कृत्य करणाऱ्या ऑफ स्पिनर सूरज रणदिववर एका सामन्याची बंदी घातली तर त्याला हे कृत्य करायला लावणाऱ्या तिलकरत्ने दिलशान या सलामीवीर फलंदाजाला एका सामन्याच्या मानधनाचा दंड ठोठावत या प्रकरणावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. संघाचा विजय आणि वैयक्तिक शतक यासाठी एका धावेची गरज असताना, वीरेंद्र सेहवागने आपल्या स्टाईलने षटकार ठोकत विजय आणि शतक याचा आनंद व्यक्त केला. पण, ऑफ स्पिनर सूरज रणदिवने टाकलेला तो चेंडू नो बॉल होता. पण, हा नो बॉल चुकून नव्हे तर जाणूनबुजून टाकला गेल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.
Thursday, August 19, 2010 AT 09:35 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दम्बुला, दि. 18 (वृत्तसंस्था) : श्रीलंका संघाचे खेळाडू सध्या नो बॉलच्या फेऱ्यात अडकले असले, तरी त्यापासून प्रभावित झाल्यामुळे नव्हे, तर अतिरिक्त क्रिकेटमुळे थकलेल्या त्यांच्या संघावर आम्ही निश्चितपणाने मात करू, असा निर्धार न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरने बुधवारी व्यक्त केला. श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील चौथा आणि श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडचा संघ खेळणार आहे. त्याबाबत विचारले असता टेलरने ही टिप्पणी केली. टेलर म्हणाला, श्रीलंका संघाने सलग दोन सामने खेळले असून अशा स्थितीत संघाला विजयासाठी खेळणे तितकेसे सोपे जात नाही. श्रीलंकन संघातील खेळाडू आता चांगलेच थकले आहेत. भारताविरुद्धची कसोटी मालिकाही खूपच खडतर होती. त्यामुळे आम्ही या बाबीचा फायदा उठवणार आहोत. तसे पाहिले तर श्रीलंकेचा संघ हा बलाढ्य आहे आणि ते त्यांच्या मायभूमीत खेळत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, ते निश्चितपणाने झुंजार खेळाचे प्रदर्शन घडवतील. सेहवागच्या बाबतीत बोलताना तो म्हणाला की, सेहवाग हा शतकाचा हकदार होता पण, तसे झाले नाही. सेहवागसाठी ही खूपच दुर्दैवी बाब आहे.
Thursday, August 19, 2010 AT 09:34 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा महासंघा(सीजीएफ) चे अध्यक्ष माईक फेनेल यांनी बुधवारी राजधानी दिल्लीस्थित काही आयोजन स्थळांना भेट देऊन माहिती घेतली. फेनेल 3 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी भारत दौऱ्यावर आले असून बुधवारी सकाळी 9 वाजता त्यागराज स्टेडियमवर ते पोहचले. तेथे ते 15 मिनिटे थांबले होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरु स्टेडियमकडे रवाना झाले. तेथे उद्घाटन आणि समारोप समारंभाचे आयोजन होणार असून त्याविषयी त्यांनी माहिती घेतली. यावेळी फेनेल यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी माईक हुपर हे देखील उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आणि खेळगावालाही भेट दिली. फेनेल यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्यात अनेक शासकीय अधिकारी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय नगरविकास मंत्री एस. जयपाल रेड्डी आणि आयोजन समितीच्या कार्यकारिणीतील अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. फेनेल यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आयोजन समितीवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप केले जात आहेत.
Thursday, August 19, 2010 AT 09:33 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|