|
|
|
Total Results: 68
|
|
|
|
|
मुंबई, दि. 19 (प्रतिनिधी) : महापालिकेच्या विभाजनाच्या प्रस्तावामागे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र असून कॉंग्रेसचा हा डाव कदापी यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मुंबई महापालिकेचे विभाजन करावे या कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेल्या मागणीचा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज प्रखर शब्दात समाचार घेतला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कॉंग्रेसचा जुना डाव आहे. दिल्लीतील नेते इथल्या छोट्या-छोट्या नेत्यांकडून अशा पुड्या सोडून लोकांची प्रतिक्रिया जाणून घेत असतात. ही त्यांची जुनी पद्धत आहे परंतु हा डाव शिवसेना कदापी यशस्वी होऊ देणार नाही. 50 वर्षांपूर्वी कॉंग्रेस नेत्यांशी लढूनच मराठी माणसांनी संयुक्त महाराष्ट्र मिळवला होता. राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मुंबई तोडण्याचा डाव हाणून पाडू. कॉंग्रेसचे खायचे व दाखवायचे दात घशात घालू, असे उद्धव ठाकरे यांनी "मातोश्री' येथे पत्रकारांशी बोलताना ठणकावले. मलेरियाच्या साथीबद्दल महापालिकेला दोषी ठरवण्याच्या प्रयत्नांवर सडकून टीका करताना सरकारने यासाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला.
Friday, August 20, 2010 AT 10:08 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : "कायदा मोडणाऱ्यांनाच आम्ही मोडतो', अशी गर्जना करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शहरांमधील रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे नवी "धडक' मोहीम राबवणार असल्याची घोषणा केली. मनसे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवते, असे संकेत देत राज ठाकरे यांनी सरकारला चपराक लगावली आहे.
Thursday, August 19, 2010 AT 10:23 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
हैद्राबाद, दि. 18 (वृत्तसंस्था) : सत्यम कॉम्प्युटर्समधील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने यातील मुख्य आरोपी बी. रामलिंग राजू यांना जामीन मंजूर केला. प्रकृतीच्या कारणांमुळे राजू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. राजू यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात यावे,        अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील हरिन रावळ यांनी न्यायालयाकडे केली. गेल्या सप्टेंबरपासून प्रकृतीचे कारण देऊन राजू वारंवार न्यायालयीन प्रक्रिया टाळत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. राजू यांच्या प्रकृतीबाबत निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालावरही त्यांनी शंका व्यक्त केली. सत्यम गैरव्यवहार प्रकरणातील अन्य नऊ आरोपींना न्यायालयाने याआधीच जामीन मंजूर केला आहे.
Thursday, August 19, 2010 AT 10:21 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कापकोट, दि. 18 (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधीलकापकोट येथे ढगफुटीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 मुलांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही मुले सापडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शाळेची इमारत कोसळली तेव्हा शाळेत किती विद्यार्थी उपस्थित होते, यांची माहिती मिळू शकली नाही. कापकोट भागातील सरस्वती शिशु मंदिर शाळेची ही इमारत आहे. डोंगराळ भागात ही शाळा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
Thursday, August 19, 2010 AT 10:20 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : वादग्रस्त ठरलेले आण्विक दायित्व विधेयक आज (बुधवारी) संसदीय समितीने संसदेच्या दोन्ही सदनातील पटलावर सादर केले. भारतीय जनता पक्षाने उपस्थित केलेल्या सर्व शंकांची सरकारने दखल घेतल्यामुळे, या पक्षाचा विरोध मावळला असला, तरी डाव्या पक्षांचा विरोध कायम आहे. राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी करून या विधेयकाला त्यांनी विरोध केल्यामुळे, राज्यसभा गोंधळातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. भारताने जगभरातील विविध देशांबरोबर नागरी आण्विक करार करण्याची तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणण्यात आले. हे करार करता यावेत, यासाठी हे विधेयक मंजूर होणे गरजेचे आहे.    दरम्यान, आण्विक दायित्व विधेयक मंजुरीच्या बदल्यात भाजपने नरेंद्र मोदी यांना सोहराबुद्दीन प्रकरणी कचाट्यात सापडलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना वाचविण्यासाठी कॉंग्रेसबरोबर साटेलोटे केल्याचा आरोप राजद आणि सपा यांनी केला आहे. मात्र तो कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी फेटाळून लावला आहे.
Thursday, August 19, 2010 AT 10:18 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|