Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 69
नवी दिल्ली, दि.21(वृत्तसंस्था) ः केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 300 टक्के पगारवाढीनेही समाधान न झालेल्या विरोधकांना शांत करण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पगारवाढीबाबत फेरविचार करण्याचे मान्य केले आहे. आपण स्वतः पंतप्रधानांशी चर्चा करुन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिले. त्यामुळे आता सर्व खासदारांना संतुष्ट करण्यासाठी केंद्र सरकार 500 टक्के पगारवाढीचा निर्णय घेईल काय, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने खासदारांच्या पगारवाढीसंबंधी नेमलेल्या संसदीय समितीने  दरमहा 80,001 रुपये बेसिकची शिफारस केली होती. परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खासदारांचा पगार 16 हजारांवरुन 50 हजार रुपये करण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय त्यांच्या भत्त्यां-मध्येही घसघशीत वाढ करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले. परंतु या तिप्पट पगारवाढीने आणि भरमसाठ भत्त्यांनीही भाजप, सपा, राजद आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांचे समाधान झाले नाही. या एवढ्याशा पगारवाढीबद्दल त्यांनी लोकसभा, राज्यसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पगारवाढीसाठी गोंधळ घातला.
Sunday, August 22, 2010 AT 10:07 AM (IST)
मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : गणेशोत्सव आणि रमजान या सणासुदीच्या काळात भारनियमन कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सायंकाळी 6 ते रात्री 9 आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भारनियमन होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. गणेशोत्सव आणि रमजान सणांच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांतून वीज भारनियमन न करण्याबाबत मागणी झाली होती. या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी इतर स्त्रोतातून वरील काळासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने यावेळी घेतला आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री अजित पवार, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, ऊर्जा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार या बैठकीस उपस्थित होते. भारनियमन न करण्याची घोषणा करण्यात आलेली असली तरी त्यासाठी मागणी करावी लागणार आहे. भारनियमन रद्द करण्यासाठी 500 मेगावॅट अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. बाहेरून ही वीज घ्यावी लागणार आहे.
Thursday, August 19, 2010 AT 10:22 AM (IST)
  डागली संहारक क्षेपणास्त्रे  वारंवार सीमेचे उल्लंघन  लष्कराच्या वाढत्या हालचाली वॉशिंग्टन, दि. 17 (वृत्तसंस्था) : भारताच्या सीमेलगत चीनच्या लष्कराने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत, एवढेच नव्हे तर या क्षेत्रात चीनने लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे लष्करी मुख्यालय पॅंटॉगानने दिले आहे. पॅंटॉगानच्या दाव्यानुसार चीनने भारतीय सीमेलगत अत्याधुनिक सीएसारस-6 क्षेपणास्त्रे डागली आहेत. याखेरीज चीनचे हवाई दल सीमेलगत तात्काळ पोहोचेल अशी योजनाही तयार ठेवली आहे. चीन आणि भारत यांच्यातील राजनैतिक आणि आर्थिक संबंधात सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न झाल्यानंतरही उभय देशात सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय सीमेचे उल्लंघन आणि आक्रमकसीमागस्त वाढल्यामुळे हा तणाव वाढला आहे. सीमेलगत चीनने आपल्या सैन्याच्या हालचाली वाढविल्या आहेतच याखेरीज जादा सैन्य दलाची कुमक तैनात केली आहे. थोडक्यात भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या 4067 किलोमीटर लांब सीमा क्षेत्रातील परिस्थिती तशी सामान्य दिसत नाही.
Wednesday, August 18, 2010 AT 10:30 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे व्यापक बैठकीत दिली. त्याचबरोबर सुरेश कलमाडी यांचे आयोजन समितीचे अध्यक्षपद अबाधित ठेवले असले तरी संयोजन समितीवर देखरेखीसाठी मंत्र्यांचा एक गट गठित केला आहे. या मंत्रिगटावर स्पर्धेच्या सर्व बाबींवर देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनातील गैरकारभारावर विरोधकांनी हल्लाबोल चढवला असताना खुद्द पंतप्रधानांनी गंभीर दखल घेतली आहे.  येत्या ऑक्टोबरमध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत तरी या स्पर्धेची तयारी अद्याप पूर्ण झाली नाही. पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. स्पर्धेच्या आयोजनाबाबत आलेल्या तक्रारींची तपशीलवार चौकशी करा आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे फर्मान त्यांनी सोडले. या बैठकीला क्रीडामंत्री एम.एस.
Sunday, August 15, 2010 AT 11:48 AM (IST)
सातारा, दि. 13 : सातारा शहरातील सराफ कट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेतील श्री वर्धमान ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानास शुक्रवारी सकाळी 8 वाजता शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत दुकानातील किंमती दागिने, फर्निचर, संगणक, लॅपटॉपसह  इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 20 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब तात्काळ दाखल झाले. पण, आग आटोक्यात आणताना या अग्निशामक बंबांची निष्क्रियताही सातारकरांना पहावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदाशिव पेठेत श्री वर्धमान ज्वेलर्स हे दुकान असून सकाळी 8 वाजता हे दुकान उघडलेले नसतानाच, दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे ये-जा करणारे नागरिक व तेथील अन्य व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेजारच्या व्यापाऱ्यांनी वर्धमान ज्वेलर्सचे मालक नितीन बोहरा यांना दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
Saturday, August 14, 2010 AT 11:25 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: