|
|
|
Total Results: 88
|
|
|
|
|
ज्यांचे नाव घेताच इंग्रज काळे निळे पडत, अशा या क्रांतीकारकाचे नाव वासुदेव बळवंत फडके होय. त्यांचा जन्म पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला. पुण्याला नोकरीला असताना त्यांची आई खूप आजारी पडली. त्यामुळे गावी जाणे त्यांना भाग होते. परंतु त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. शेवटी कार्यालयात चिठ्ठी ठेवून ते आपल्या गावी आले. तत्पूर्वी आईचे निधन झाले होते. आईची भेट न झाल्यामुळे ते दु:खी होते. सुट्टी न देणाऱ्या अधिकाऱ्याचा राग आला. त्यामुळे इंग्रजांविरुध्दचा त्यांचा रोष वाढतच गेला. पुढे स्वत:चे खडे सैन्य उभे केले. बऱ्याच जिल्ह्यांत त्यांचा दरारा निर्माण झाला. त्यामुळे इंग्रज हैराण झाले होते. वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी चार हजारांचे इनाम जाहीर केले. हे त्यांना कळताच त्यांनी अशी घोषणा केली की, मुंबईचे राज्यपाल व आपल्या सहकाऱ्यांना काळ्या  पाण्याची शिक्षा ठोठावणारे पुणे जिल्हाधिकारी व सत्र न्यायाधिश यांचे मस्तक आणून देणाऱ्यांना अनुक्रमे पाच व तीन हजारांची बक्षिसे दिली जातील. देशासाठी स्वत:च्या आयुष्याची होळी करणारे वासुदेव बळवंत फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली.
Thursday, September 09, 2010 AT 09:12 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ते तिघे हॉटेलात पोटभर जेवले. काऊंटरनं तीस रुपयांचं बिल दिलं. त्यांनी तीस रुपये दिले व ते हॉटेलबाहेर पडले. हॉटेलमालकाने हिशोब केला, त्याला वाटले, आपण पाच रुपये अधिक घेतले. त्याने एका नोकराला हाक मारुन सांगितलं. नोकर पळत निघाला. वाटेत मनाशी हिशेब केला. त्यांना, पाच अधिक घेतले, हे काही माहित नाही, शिवाय पाच तिघात वाटायचे कसे? असा विचार करुन त्यानं दोन रुपये खिशात घातले आणि तीन रुपये त्यांना दिले. त्या तिघांना मालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटलं. आपण प्रत्येकी दहा रुपये दिले होते, आता एक-एक रुपया परत मिळाला, म्हणजे प्रत्येकी नऊच रुपये पडले. अर्थात एकूण सत्तावीस रुपये झाले असं त्याचं गणित होतं. हे सत्तावीस आणि नोकरानं दोन रुपये घेतले, म्हणजे एकूण झाले एकोणतीस रुपये. मग एक रुपया कोठे गेला? तात्पर्य : गणिताने सर्वच प्रश्न सुटतील असे नाही.
Wednesday, September 08, 2010 AT 10:39 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
तो श्रमिक कामाच्या शोधात अनवाणीच भरभर चालत निघाला होता. त्याच्या पायाला रस्त्यावरचं शेण लागलं. त्यांनी ते घसाघसा पुसलं अन् तो पुढं गेला. त्याच रस्त्यानं एक पंडित अनवाणी देवदर्शनाला निघाले होते. त्यांच्या पायाला रस्त्यावरचं शेण लागलं. त्यांनी हातानं उचलून काय लागलं ते पाहिलं. नाकाला हात लावून वास घेतला. शेण आहे, असं त्यांनी ओळखलं. "अरेरे! माझ्या स्वच्छ पायाला शेण लागावं ना? नशीब माझं, दुसरं काय?'  असं म्हणत कपाळाला हात लावला. त्या श्रमिकाला, तो अडाणी असल्याने केवळ पायाला एकाच ठिकाणी शेण लागलं, पण पंडित शहाणा असल्यानं पाय, हात, नाक व कपाळ अशा चार ठिकाणी शेण लागलं. कधी कधी शहाणपण अंगलट येतं, ते असं. तात्पर्य : कधी कधी शहाणपण अंगलट येऊ शकते.
Tuesday, September 07, 2010 AT 10:47 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अनाथ, गोरगरीबांना न्याय देऊन त्यांना मदत करावी, अशी शिकवण देणारे रामसिंह यांचा जन्म वसंत पंचमीला लुधियानातील मैनी या छोट्याशा गावी झाला. रामसिंहाना त्यांच्या आईने लहानपणीच महाराणा रणजित सिंहांच्या विविध गोष्टी सांगितल्या होत्या. रामसिंहाच्या नोकरी गेल्यानंतरच्या काळात त्यांनी स्वत:ला शेती व आध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेतले. रामसिंहाने भारतीय जनतेची अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. विदेशीवर बहिष्कार व स्वदेशीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना विविध प्रकारे यातना दिल्या व छळ केला. तरीसुध्दा रामसिंहांनी आपला स्वदेशीचा प्रचार थांबविला नाही. त्यांनी "कूका' सांप्रदायाची स्थापना केली. ईश्वरभक्ती, खरे बोलणे, हेच त्यांचे ब्रीद होते. त्यांनी समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते शेवटपर्यंत स्वदेशी, स्वदेश व स्वधर्मासाठी लढले.   तात्पर्य : स्वत:ला स्वदेशी व स्वदेशासाठी अर्पण करणे हेच आपले कर्तव्य आहे.    
Sunday, September 05, 2010 AT 10:40 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बनारसला हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत असताना लाल बहाद्दूर शास्त्रींना खरे गुरु भेटले. त्यांचे नाव निष्कामेश्वरजी मिश्रा होय. मिश्राजी शाळेत अभ्यासक्रमाबरोबर ऐतिहासिक नेत्यांच्या गोष्टी सांगत असत. त्यातून राष्ट्रीय चळवळीची माहिती मुलांना मिळत असे. अशा गोष्टीतून मुलांचे राष्ट्रावरील प्रेम दृढ होत होते. याच काळात लालबहाद्दुरांना लोकमान्य व महात्मा गांधींची भाषणे ऐकावयास मिळाली. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला.टिळकांचे भाषण ऐकण्यासाठी बनारसला जायचे होते परंतु जवळ पैसा नव्हता. उसने मागण्याची सवय नव्हती. नाईलाजाने त्यांनी मित्राकडून रेल्वे प्रवासासाठी पैसे घेतले वे ते बनारसला गेले. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,' ही टिळकांची गर्जना ऐकून लाल बहाद्दुरांचे मन पेटून निघाल्यास नवल नाही. त्याच सुमारास जालियानवाला बाग हत्याकांडामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. सर्वांबरोबर लालबहाद्दूर यांनीही परीक्षेवर बहिष्कार टाकला. तेव्हा त्यांच्यावर कठोर टीका झाली. परंतु त्यांनी आपला हट्ट कायम ठेवला. बनारसला येवून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. वयाच्या 17 व्या वर्षी प्रथम अटक झाली.
Saturday, September 04, 2010 AT 10:31 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|