Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 31
कित्तुरची राणी चन्नमा अतिशय शूर, चतुर व राजकारणकुशल होती. तशीच ती दिलदार स्वभावाची होती. इंग्रज सरकारने तिचा दत्तकवारस नामंजूर केला. पण झाशीच्या राणीप्रमाणे चन्नमाही डगमगली नाही. इंग्रजांनी कित्तुर संस्थान खालसा केले. संस्थानवर हल्ला केला. रणरागिणी चन्नमाने संस्थान वाचविण्यासाठी युध्दाची तयारी केली. युध्दाला तोंड फुटले. युध्द चालू असताना राणीच्या सैन्याच्या हाती काही इंग्रज मुले सापडली. सैनिकांनी त्या मुलांना पकडून राणीपुढे आणले. अनेकांना वाटले ही शत्रुची मुले आहेत. राणी आता यांना जिवंत ठेवणार नाही. ती मुले भीतीने थरथर कापत होती. आपण आता मरणार असेच त्यांना वाटत होते. राणीने एकदा त्या मुलांकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने अत्यंत जळजळीत नजरेने आपल्या सैनिकांकडे पाहिले व ती कडाडली. "तुम्हाला काही दया, माया आहे की नाही? शूर म्हणविता आणि या लहान, निष्पाप मुलांना पकडून आणता? ही मुले निरपराध आहेत. आपले वैर इंग्रजांशी, इंग्रज सैनिकांशी आहे. त्यांच्या बायका मुलांशी नाही.' राणी चन्नमाने त्या मुलांना सोडून दिले. त्यांना खाऊ पिऊ घातले व त्यांच्या आई-वडिलांकडे पाठविले.
Monday, August 23, 2010 AT 06:47 AM (IST)

सरस्वतीच्या तीरावर नर आणि नारायण या दोन ऋषींचे आश्रम होते. नर, नारायण भाऊ-भाऊ होते. त्यांचे आश्रम अत्यंत रमणीय, पवित्र होते. त्या आश्रमात पशु-पक्षी मोठ्या गुण्यागोविंदाने वावरत असत. तेथील पाना-फुलांना कोणी परवानगीशिवाय स्पर्शही करीत नसे. एकदा नर समिधा आणण्यासाठी आश्रमाच्या बाहेर गेला होता. त्याचवेळी नारायण नराला भेटण्यासाठी आला. नर आश्रमात नसल्याने नारायण त्याची वाट पाहत बसला. नारायणाला भूक लागली होती, म्हणून त्याने एका वृक्षाखाली पडलेली फळे गोळा केली व तो ती खाऊ लागला. त्याचवेळी नर तेथे आला. नारायण फळे खात आहे हे पाहून नराला अतिशय राग आला. तो नारायणाला म्हणाला, "तू परवानगी न घेता फळे खाल्लीस. तू चोर ठरला आहेस. तुला शिक्षा होणारच. तू आता राजाकडे जा व त्याला सगळी हकीगत सांग. तो तुला योग्य ती शिक्षा करील.' नारायणाने राजाकडे जाऊन सगळी हकीगत सांगितली व "मला शिक्षा करा' अशी राजाला विनंती केली. राजा म्हणाला, "तुझ्या हातून फार मोठा अपराध घडलेला नाही आणि काही अपराध असेलच तर तो तू कबूल केल्यामुळे नाहीसा झाला आहे.' पण नारायण पुन्हा पुन्हा म्हणाला, "महाराज, मी अपराध केला आहे व अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे.
Saturday, August 14, 2010 AT 10:49 AM (IST)
  एका बोटीवर एक कोळ्याचा मुलगा नोकरीला होता. बोटीवरील सगळे लोक दारु पीत होते. त्यांनी त्या मुलाला दारु दिली पण त्याने दारु पिण्यास साफ नकार दिला. त्या बोटीवरील कप्तानाला त्या मुलाचा राग आला. तो दारुने भरलेला ग्लास त्या मुलाला देत म्हणाला, "मी सांगतो म्हणून मुकाट्याने हा दारुचा ग्लास तोंडाला लाव नाहीतर तुला समुद्रात फेकून देईन' तो मुलगा हात जोडून म्हणाला, "साहेब, तुमची आज्ञा मोडताना मला वाईट वाटते. पण साहेब, मला क्षमा करा. मी दारुला स्पर्शही करणार नाही. मी माझ्या आईला तसे वचन दिले आहे.' तू दारु न पिण्याचे वचन आईला का म्हणून दिलेस?' कप्तानाने असे दरडावून विचारले असता तो मुलगा म्हणाला, "साहेब, माझे वडीलसुध्दा बोटीवर नोकरीला होते. त्यांना असेच संगतीने दारुचे व्यसन लागले. ते दारु पिऊन माझ्या आईला मारझोड करायचे. दारुसाठी त्यांनी घरातल्या सगळ्या वस्तू विकून टाकल्या. मग ते दारुसाठी चोऱ्यामाऱ्या करू लागले. दारुमुळे त्यांना अनेक रोग झाले व शेवटी दारु पिता पिताच त्यांना मरण आले. दारु खरोखर विष आहे. म्हणून मी दारूला स्पर्श न करण्याचे आईला वचन दिले आहे. मला कोणतीही शिक्षा करा पण प्राण गेला तरी मी दारु पिणार नाही.
Tuesday, August 10, 2010 AT 08:25 AM (IST)
चंद्रगुप्त मौर्याचा नातू,  बिंदुसाराचा मुलगा अशोक हा लहानपणापासून अत्यंत पराक्रमी होता. आपल्या आजोबांप्रमाणे मोठा राजा व्हावे असे त्याला वाटत असे पण तो युवराज म्हणजे मोठा मुलगा नव्हता. त्यामुळे तो राजा होणे कठीणच होते. अशोकाचे वडील बिंदुसार वृध्द झाले तेव्हा आपल्यानंतर अशोकच गादीवर बसावा, असे त्यांना मनापासून वाटत होते. पण हे कसे शक्य आहे? बिंदुसार आपल्या गुरुंना भेटले व त्यांना आपली इच्छा सांगितली. तेव्हा राजगुरु म्हणाले,"मी सर्व राजपुत्रांची परीक्षा पाहतो व त्यात जो लायक ठरेल, त्याला राजा करु.' मग ते राजपुत्रांना म्हणाले, "मी तुमची परीक्षा पाहणार आहे. त्यात जो श्रेष्ठ ठरेल तो बिंदुसारांचा उत्तराधिकारी होईल. उद्या रात्री भोजन झाल्यावर माझ्याकडे या.' तिघेही राजपुत्र राजगुरुंकडे जाण्यास निघाले. युवराज क्षीरगुप्ताने अगदी भारी किमतीचा पोषाख धारण केला. सुवर्णरत्नांचे अलंकार अंगावर घातले व एका सजविलेल्या हत्तीवर बसून तो राजगुरुंकडे निघाला. दुसरा राजपुत्र मायावीराज तोही क्षीरगुप्ताप्रमाणेच मोठ्या थाटामाटाने राजगुरुंकडे निघाला.
Sunday, August 08, 2010 AT 08:34 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: