|
|
|
Total Results: 442
|
|
|
|
|
नागपूर, दि. 8 (वृत्तसंस्था) : विदर्भात गेल्या दोन दिवसात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समिती या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिलीप राजुरकर, गंगुबाई गनपदे, विजय पानरे, वर्धा जिल्ह्यातील हनुमान चौधरी आणि अकोल्यातील महादेव वरणे यांनी गेल्या दोन दिवसात आत्महत्या केल्या. विदर्भात वर्षभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 572 झाली आहे.
Thursday, September 09, 2010 AT 10:08 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
श्रीनगर, दि. 8 (वृत्तसंस्था) : हुर्रियत कॉन्फरन्सचा आणि फुटीरतावादी सय्यद अली शाह गिलानी याला जम्मू-काश्मीरच्या राजधानी श्रीनगरमध्ये आज अटक करण्यात आली. सतर्कता म्हणून गिलानीला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कालच गिलानी याने म्हटले होते, की जम्मू-काश्मीरमध्ये लोकेच्छा मानून तोडगा काढला पाहिजे. वाटाघाटी सुरू करण्यासाठी आमच्या पाच अटी आहेत. त्या मानल्या नाही तर लोकांनी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. आमच्या अटी मान्य केल्या नाही तर दिल्लीला पश्चात्ताप करावा लागेल.
Thursday, September 09, 2010 AT 09:50 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली, 8 (वृत्तसंस्था) : "स्पॉट फिक्सिंग'च्या आरोपांमुळे अडचणीत आलेला पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मदअसिफवर त्याची मैत्रीण व पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने नवा बॉंबगोळा टाकला आहे. असिफचे मॉडेल्स, बार डान्सर्स, दुय्यम दर्जाच्या अभिनेत्री आणि कॉलगर्ल्सशीही संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. असिफ मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे सांगणाऱ्या वीणाने आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटकडे हे पुरावे नुकतेच सोपवले. आता तिने असिफवर नवे आरोप केले आहेत. या संबंधांच्या संशयामुळे आपण असिफवर नजर ठेवण्यासाठी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमला होता. त्याच्याकडूनच असिफच्या मॅच फिक्सिंगबद्दल आपल्याला माहिती मिळाल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, आमचे डेटिंग सुरू असतानाही  असिफ वेगवेगळ्या महिलांशी संबंध ठेवत असल्याचा मला संशय होता. तो नेहमी पार्ट्यांमध्ये गुंग असायचा आणि मुलींसमवेत सहली काढायचा. त्याला वारंवार टेक्स्ट मेसेज पाठवणाऱ्या एका व्यक्तीबद्दल मला संशय होता. तो मला फसवत आहे, असेही मला वाटायचे. त्यामुळे मी एक डिटेक्टिव्ह नेमला. या डिटेक्टिव्हने सांगितलेली माहिती धक्कादायक होती.
Thursday, September 09, 2010 AT 09:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रांची, दि. 7 (वृत्तसंस्था) : झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांची मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडंटस युनियन यांच्या साथीने झारखंडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून सरकार बनविण्यावरून झारखंडमध्ये सुरू असलेल्या वादावर यामुळे पडदा पडण्याची शक्यता आहे. सध्या झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंडमधील तीन प्रमुख राजकीय पक्ष नव्याने सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली होती. भाजपचे वरिष्ठ नेते अजय मारू म्हणाले, की आम्ही नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.      भाजपचे आमदार नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करतील तसेच त्याबाबतचा दावा करण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेतील.
Wednesday, September 08, 2010 AT 11:07 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : लवासा प्रकल्पातील गैरप्रकारांची सी.बी.आय. चौकशी करण्याची मागणी महसूल मंत्री नारायण राणे यांनी आज मंगळवारी सपशेल फेटाळूनलावली. आदिवासी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरणाच्या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगतानाच लवासा हा काही फार मोठा विषय नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. प्रदेश कॉंग्रेस कार्यालय, गांधी भवन येथे आज महसूल मंत्री नारायण राणे यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी लवासा प्रकल्पाची सी.बी.आय. चौकशी करण्याची भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची मागणी फेटाळून लावली. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्र्न असताना लवासा हा काही सरकारला मोठा प्रश्र्न वाटत नाही. मुंडे यांनी मागणी केली म्हणून चौकशी करण्याची  गरज नाही. मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांची सी.बी.आय. चौकशी झाली का, असा सवाल करताना त्यांनी काय निर्णय घेतले होते, याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. लवासा प्रकल्पात आदिवासी जमिनीचे नियमबाह्य हस्तांतरण झाले आहे का, याची चौकशी सुरू आहे.
Wednesday, September 08, 2010 AT 11:03 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|