Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विदर्भात दोन दिवसात पाच शेतकऱ्यांची आत्महत्या
ऐक्य समूह
Thursday, September 09, 2010 AT 12:38 AM (IST)
Tags: news
नागपूर, दि. 8 (वृत्तसंस्था) : विदर्भात गेल्या दोन दिवसात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समिती या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिलीप राजुरकर, गंगुबाई गनपदे, विजय पानरे, वर्धा जिल्ह्यातील हनुमान चौधरी आणि अकोल्यातील महादेव वरणे यांनी गेल्या दोन दिवसात आत्महत्या केल्या. विदर्भात वर्षभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 572 झाली आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: