Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीर : फुटीरतावादी नेता गिलानी याला अटक
ऐक्य समूह
Thursday, September 09, 2010 AT 12:20 AM (IST)
Tags: news


श्रीनगर, दि. 8 (वृत्तसंस्था) : हुर्रियत कॉन्फरन्सचा आणि फुटीरतावादी सय्यद अली शाह गिलानी याला जम्मू-काश्मीरच्या राजधानी श्रीनगरमध्ये आज अटक करण्यात आली. सतर्कता म्हणून गिलानीला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कालच गिलानी याने म्हटले होते, की जम्मू-काश्मीरमध्ये लोकेच्छा मानून तोडगा काढला पाहिजे. वाटाघाटी सुरू करण्यासाठी आमच्या पाच अटी आहेत. त्या मानल्या नाही तर लोकांनी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. आमच्या अटी मान्य केल्या नाही तर दिल्लीला पश्चात्ताप करावा लागेल.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: