Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लवासाप्रकरणी सीबीआय चौकशीस राणेंचा नकार
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 01:33 AM (IST)
Tags: news
मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : लवासा प्रकल्पातील गैरप्रकारांची सी.बी.आय. चौकशी करण्याची मागणी महसूल मंत्री नारायण राणे यांनी आज मंगळवारी सपशेल फेटाळूनलावली. आदिवासी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरणाच्या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगतानाच लवासा हा काही फार मोठा विषय नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
प्रदेश कॉंग्रेस कार्यालय, गांधी भवन येथे आज महसूल मंत्री नारायण राणे यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी लवासा प्रकल्पाची सी.बी.आय. चौकशी करण्याची भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची मागणी फेटाळून लावली. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्र्न असताना लवासा हा काही सरकारला मोठा प्रश्र्न वाटत नाही. मुंडे यांनी मागणी केली म्हणून चौकशी करण्याची  गरज नाही. मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांची सी.बी.आय. चौकशी झाली का, असा सवाल करताना त्यांनी काय निर्णय घेतले होते, याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. लवासा प्रकल्पात आदिवासी जमिनीचे नियमबाह्य हस्तांतरण झाले आहे का, याची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य कारवाई होईल, असे राणे यांनी सांगितले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: