एक रुपया कोठे गेला?
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 01:09 AM (IST)
ते तिघे हॉटेलात पोटभर जेवले. काऊंटरनं तीस रुपयांचं बिल दिलं. त्यांनी तीस रुपये दिले व ते हॉटेलबाहेर पडले.
हॉटेलमालकाने हिशोब केला, त्याला वाटले, आपण पाच रुपये अधिक घेतले. त्याने एका नोकराला हाक मारुन सांगितलं. नोकर पळत निघाला. वाटेत मनाशी हिशेब केला. त्यांना, पाच अधिक घेतले, हे काही माहित नाही, शिवाय पाच तिघात वाटायचे कसे? असा विचार करुन त्यानं दोन रुपये खिशात घातले आणि तीन रुपये त्यांना दिले. त्या तिघांना मालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटलं. आपण प्रत्येकी दहा रुपये दिले होते, आता एक-एक रुपया परत मिळाला, म्हणजे प्रत्येकी नऊच रुपये पडले. अर्थात एकूण सत्तावीस रुपये झाले असं त्याचं गणित होतं.
हे सत्तावीस आणि नोकरानं दोन रुपये घेतले, म्हणजे एकूण झाले एकोणतीस रुपये. मग एक रुपया कोठे गेला?
तात्पर्य : गणिताने सर्वच प्रश्न सुटतील असे नाही.