Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

शहाण्याला चार ठिकाणी
ऐक्य समूह
Tuesday, September 07, 2010 AT 01:17 AM (IST)
Tags: bodhkatha
तो श्रमिक कामाच्या शोधात अनवाणीच भरभर चालत निघाला होता. त्याच्या पायाला रस्त्यावरचं शेण लागलं. त्यांनी ते घसाघसा पुसलं अन्‌ तो पुढं गेला.
त्याच रस्त्यानं एक पंडित अनवाणी देवदर्शनाला निघाले होते. त्यांच्या पायाला रस्त्यावरचं शेण लागलं. त्यांनी हातानं उचलून काय लागलं ते पाहिलं. नाकाला हात लावून वास घेतला. शेण आहे, असं त्यांनी ओळखलं. "अरेरे! माझ्या स्वच्छ पायाला शेण लागावं ना? नशीब माझं, दुसरं काय?'  असं म्हणत कपाळाला हात लावला.
त्या श्रमिकाला, तो अडाणी असल्याने केवळ पायाला एकाच ठिकाणी शेण लागलं, पण पंडित शहाणा असल्यानं पाय, हात, नाक व कपाळ अशा चार ठिकाणी शेण लागलं.
कधी कधी शहाणपण अंगलट येतं, ते असं.
तात्पर्य : कधी कधी शहाणपण अंगलट येऊ शकते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: