Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

स्वदेशी
ऐक्य समूह
Sunday, September 05, 2010 AT 01:10 AM (IST)
Tags: bodhkatha

अनाथ, गोरगरीबांना न्याय देऊन त्यांना मदत करावी, अशी शिकवण देणारे रामसिंह यांचा जन्म वसंत पंचमीला लुधियानातील मैनी या छोट्याशा गावी झाला. रामसिंहाना त्यांच्या आईने लहानपणीच महाराणा रणजित सिंहांच्या विविध गोष्टी सांगितल्या होत्या. रामसिंहाच्या नोकरी गेल्यानंतरच्या काळात त्यांनी स्वत:ला शेती व आध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेतले. रामसिंहाने भारतीय जनतेची अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. विदेशीवर बहिष्कार व स्वदेशीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना विविध प्रकारे यातना दिल्या व छळ केला. तरीसुध्दा रामसिंहांनी आपला स्वदेशीचा प्रचार थांबविला नाही. त्यांनी "कूका' सांप्रदायाची स्थापना केली. ईश्वरभक्ती, खरे बोलणे, हेच त्यांचे ब्रीद होते. त्यांनी समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते शेवटपर्यंत स्वदेशी, स्वदेश व स्वधर्मासाठी लढले.
 तात्पर्य : स्वत:ला स्वदेशी व स्वदेशासाठी अर्पण करणे हेच आपले कर्तव्य आहे.
 
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: