Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"अजि सोनियाचा दिनू ..!'
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:57 AM (IST)
Tags: news

सलग चौथ्यांदा कॉंग्रेस अध्यक्षपद भूषविण्याचा विक्रम
नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आज अपेक्षेप्रमाणे सोनिया गांधी यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्या चौथ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाल्या. कॉंग्रेसमध्ये सलग 12 वर्षांहून अधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा विक्रमही सोनिया गांधी यांच्या नावे जमा झाला आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या घटनेनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्षांना अर्ज भरण्याची गरज नसते. प्रस्तावकांमार्फत हा अर्ज भरता येतो. त्यामुळे सोनियांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पदाधिकारी, मंत्री आणि राज्यांच्या प्रतिनिधींची झुंबड उडाली होती.  
27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान कॉंग्रेसचे मुख्य निवडणूक अधिकारी ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे अध्यक्षपदासाठी एकूण 56 उमेदवारी अर्ज दाखल झाले त्या प्रत्येक अर्जात एकमात्र सोनिया गांधींच्या उमेदवारीचाच प्रस्ताव होता. अर्थात, कॉंग्रेसाध्यक्ष म्हणून सोनियांच्या नावाची घोषणा होणे पक्के होते, त्यानुसारच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली गेली.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: