रुडिशा, फराह यांची राष्ट्रकुलमधून माघार
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:17 AM (IST)
लंडन, दि. 3 (वृत्तसंस्था) : स्टेडियमच्या बांधकामातील दिरंगाई व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चक्रव्युहात अडकलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीला बड्या खेळाडूंच्या माघारीचा फटका बसत आहे.
आता केनियाचा 800 मीटर शर्यतीतील विश्वविक्रमवीर डेव्हिड रुडिशा व लांब पल्ल्याच्या शर्यतीतील युरोपियन विजेता मोहम्मद फराह यांनी आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमधून माघार घेतली आहे. 2010 मधील भरगच्च कार्यक्रमामुळे दमछाक झाल्याच्या कारणास्तव राष्ट्रकुल स्पर्धांमधून माघार घेत असल्याचे रुडिशा व फराह यांनी सांगितले.
राष्ट्रकुल स्पर्धांपेक्षा पुढील वर्षी होणारी जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धा व 2012 साली होणारे लंडन ऑलिम्पिक या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. या स्पर्धां-मध्ये आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धांमधून माघार घेत असल्याचे दोघांनीही सांगितले.