Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रजनीकांतच्या मुलीचा शाही विवाह संपन्न
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:05 AM (IST)
Tags: news
चेन्नई, दि. 3 (वृत्तसंस्था) : तमिळ सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या आणि स्टेनफोर्ड विद्यापीठाचा पदवीधर अश्विन रामकुमार यांचा विवाह आज (शुक्रवार) सकाळी चेन्नईत मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणातील बडी नेतेमंडळी आवर्जून उपस्थित होती.
चेन्नईतील पंचतारांकित राणी मय्याम्मनी सभागृहात आज (शुक्रवार) सकाळी वैदिक पध्दतीने हा सोहळा पार पडला. मान्यवरांनी सकाळी साडेसात वाजताच सभागृहात गर्दी केली होती. गुरुवारी झालेल्या साखरपुड्यालाही मान्यवरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. त्याला ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, श्रीदेवी आणि केंद्रीय मंत्री अलगिरी उपस्थित होते.
रजनीकांतने लग्नात पांढरी लुंगी, पांढरा शुभ्र कुडता आणि डोक्याला पिवळा फेटा घातला होता. सौंदर्याने प्रारंभी हिरव्या रंगाची सिल्क साडी आणि त्यानंतर नऊ यार्डाची लाल साडी नेसली होती. नवऱ्या मुलाने केवळ पांढऱ्या रंगाची लुंगी परिधान केली होती.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: