राहुल गांधी बनले अमेठीचे मसिहा
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:43 AM (IST)
अमेठी, दि. 3 (वृत्तसंस्था) : अमेठीच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासमोर आज (शुक्रवार) मतदारसंघातील नागरिकांनी तक्रारी मांडून सोडवण्याचा आग्रह धरला. राहुल तीन दिवसांपासून अमेठीच्या दौऱ्यावर आहेत.
मतदारसंघातील पक्षकार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिक तसेच अमेठी शेजारच्या जिल्ह्यातील लोकांनीही आपले प्रश्न लोकांसमोर मांडले. यात मतदारसंघातील तक्रारींचे मोठे प्रमाण होते. राहुल यांनी शांतपणे सर्वांच्या तक्रारी ऐकल्या व निवेदने स्वीकारली. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तक्रारींची सोडवणूक करण्यासंदर्भात पक्ष कार्यकर्त्यांना सूचना केल्याचे, अशोक दुबे या स्थानिक नेत्याने सांगितले.