Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पाक संघात दोन नवे चेहरे
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:13 AM (IST)
Tags: news
कराची, दि. 3 (वृत्तसंस्था) : स्पॉट फिक्सिंगचे आरोप असलेल्या सलमान बट्ट, मोहम्मद असिफ व मोहम्मद आमेर यांना वगळल्यानंतर पाकिस्तानच्या एकदिवसीय संघात असद शफिक व मोहम्मद इरफान या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
सध्या हे दोघे श्रीलंकेत पाकिस्तान "अ' संघाकडून खेळत असून ते वनडे मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होतील. 24 वर्षीय शफिक आशिया चषक स्पर्धेत पाककडून बांगलादेशविरुध्द एकच वनडे सामना खेळला होता. त्यात त्याने फक्त 17 धावा केल्या होत्या. सहा फूट आठ इंच उंचीच्या इरफानचा वेस्ट इंडिजमध्ये एप्रिल-मे दरम्यान झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत पाक संघात समावेश करण्यात आला होता. मात्र नंतर त्याचे नाव वगळण्यात आले होते. पाक संघ इंग्लंडविरुध्द 5 व 7 सप्टेंबर रोजी ट्‌वेंटी-20 व 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: