पोलीस वरिष्ठाच्या मुलाची व सुनेची आत्महत्या
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:53 AM (IST)
मुंबई, दि. 3 (प्रतिनिधी) : सहाय्यक पोलीस आयुक्त मधुसूदन कुरणे यांचा मुलगा अभिजित (वय 27) आणि सून अश्विनी (वय 21) यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) उघडकीस आला. कुरणे यांच्या मालाड येथील एव्हरशाईन अपार्टमेंटमधील घरात हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री कुरणे ड्युटीवर होते. तसेच, त्यांच्या पत्नीदेखील घरी नव्हत्या.
त्यामुळे अभिजित आणि अश्विनी दोघेच घरात होते. कुरणे यांचे सर्व्हिस रिव्हॉल्वरही घरीच होते. त्यातूनच या दोघांनी गोळ्या झाडून घेतल्या. रात्री साडेआकरानंतर हा प्रकार घडला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.