अपहृत पोलीस कर्मचाऱ्याला नक्षलवाद्यांनी खलास केले
ऐक्य समूह
Friday, September 03, 2010 AT 12:34 AM (IST)
पाटणा, दि. 2 (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण करून ज्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना बंदी बनवले आहे, त्यापैकी एक अभय यादव याला त्यांनी खलास केल्याचे वृत्त धडकले आहे
या नक्षलवाद्यांनी अपहृत चार कर्मचाऱ्यांना मुक्त करण्यासाठी आपल्या आठ साथीदारांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी केली होती व त्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपताच नक्षलवाद्यांनी अपहृत अभय यादव यांना ठार मारल्याचा दावा एका स्थानिक टीव्ही चॅनलवरून करण्यात आला. ठार करण्यात आलेले अभय यादव बेगुसराय येथील रहिवासी होते.