Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मूजवळ सीमेवर पुँछ जिल्ह्यात गोळीबार
ऐक्य समूह
Friday, September 03, 2010 AT 12:33 AM (IST)
Tags: news
जम्मू, दि. 2 (वृत्तसंस्था) :पुँछ जिल्ह्यात आज (गुरुवारी) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. गोळीबारानंतर दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांच्या घेरावातून पळ काढण्यात यश आले.
जम्मूपासून 200 कि. मी. अंतरावर असलेल्या पुँछ जिल्ह्यातील संजोट जंगल क्षेत्रात हा गोळीबार झाला. या परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर राष्ट्रीय रायफल दलाच्या आणि विशेष सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला तसेच परिसरात शोध मोहिमही सुरू केली. पहाटे चार वाजता सुरू झालेली ही मोहीम आज सकाळी संपली.
 
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: