Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संपतराव इंगवले कोयना दूध संघाचे पाचव्यांदा चेअरमन; सयाजीराव यादव व्हाईस चेअरमन
ऐक्य समूह
Friday, September 03, 2010 AT 01:15 AM (IST)
Tags: news


उंडाळे, दि. 2 : खोडशी, ता. कराड येथील कोयना सहकारी दूध संघाच्या चेअरमनपदी संपतराव इंगवले यांची सलग पाचव्यांदा तर व्हाईस चेअरमनपदी सयाजीराव यादव यांची दुसऱ्यांदा निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुनील जोशी यांनी काम पाहिले.
निवडीनंतर चेअरमन इंगवले म्हणाले, आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या प्रगतीची घोडदौड सुरु आहे. त्यांनी व संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून कोयना संघाचा नावलौकिक राज्यात करण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्यासाठी संचालक, दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांचे पूर्वीप्रमाणेच सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्यावतीने तहसीलदार सुनील जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक वसंतराव वराडकर यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले. निवडीबद्दल चेअरमन इंगवले व व्हाईस चेअरमन यादव यांचे आ. विलासराव पाटील-उंडाळकर, युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील, संघाचे सर्व संचालक, सेवक प्रतिनिधी तानाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, कार्यकारी संचालक राजीव सगरोळीकर व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: