
नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : कैद्यांना हातकडी घालण्याचा रिवाज आता नित्यनियमांचा झाला आहे, परंतु दिल्लीच्या एका न्यायालयाने कैद्यांना हातकडी घालणे हे त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन ठरते, असे म्हटले आहे.
या न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही संशयित आरोपीला कैदी म्हणून नेले जात असताना पोलीस कर्मचारी आपल्या सोईसाठी कैद्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करू शकत नाहीत. या न्यायालयाचे अतिरिक्त सत्रन्यायाधीश गिरीश कटपालिया यांनी स्पष्ट केले आहे की, कैदी कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करील असे नमूद करून पोलीस कर्मचारी कैद्याच्या मूलभूत अधिकाराला बगल देवू शकत नाही. जेल अधिकाऱ्यांनी या संदर्भात कैदी फरारी होण्याची शक्यता वाटली तर त्याच्याबरोबर पाठविल्या जाणाऱ्या रक्षकांच्या संख्येत वाढ करावी.