Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

क्रॉस कंट्री स्पर्धेत "किसन वीर'चे यश
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 11:15 PM (IST)
Tags: news


वाई, दि. 2 ः येथील किसन वीर महाविद्यालयातील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या शिवाजी विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवले.
पुरुष गटात कालिदास हिरवे याने 12.5 किमी अंतर 41 मिनिटांत पूर्ण करुन दुसरा क्रमांक मिळविला. नैनिताल येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी त्याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. त्याने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता.
सांघिक स्पर्धेत किसन वीर महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. या संघात कालिदास हिरवे, सुनील जाधव, अरविंद शिर्के, दत्तात्रय जाधव, स्वप्निल शिंदे, तुषार नेवसे यांचा समावेश होता.
खेळाडूंना क्रीडा संचालक समीर पवार, प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, संचालक, प्राध्यापक व सेवकांनी अभिनंदन केले.
 
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: