Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

ईश्वरचरणी अर्पण
ऐक्य समूह
Wednesday, September 01, 2010 AT 10:50 PM (IST)
Tags: vachnamrut
हिंदुस्थानात सर्व लोकांची नव्हे, पण जे खरे धार्मिक आहेत त्यांची दृष्टी याहून अगदी भिन्न असते. "आधी स्वर्गीचे राज्य - प्रभूकृपा संपादन करा म्हणजे तुम्हाला इतर सर्वकाही मिळेल,' हे ख्रिस्ताचे वचन येथे अस्पष्ट ऐकू येते. पण, हिंदुस्थानात या वचनावर फार जोर दिला जातो, आणि सर्वांच्या मनावर ते चांगले ठसविले जाते. या वचनाचा अर्थ असा आहे की, आपले तन-मन-धन, सर्व संबंध, आपली मालमत्ता, जग सर्व काही ईश्वराच्या चरणी अर्पण करा, ईश्वराप्रीत्यर्थ आपली मालमत्ता, जग सर्व काही अर्पण करा, ईश्वराप्रीत्यर्थ त्या सर्वांचा त्याग करा. (थॉमस पेनने म्हटल्याप्रमाणे) हे विस्तीर्ण जग तुमचे घर आहे आणि परोपकार तुमचा धर्म होऊ द्या. पण येथे आवश्यक गोष्ट म्हणजे पैसा यालाच इतिकर्तव्य समजतात आणि इतर सर्व वस्तू त्याहून गौण मानतात. तेथे ईश्वर म्हणजे आपले माहेरघर असे मानतात. इतर सर्व वस्तूंना ते इतका मान देत नाहीत. आपली घरे म्हणजे प्रवासातील मुक्कामस्थाने आहेत असे समजतात. ते आपल्या मुलाबाळांची विचारपूस करतात आणि त्यांची काळजी घेतात, पण ते त्यांची खरी किंमत जाणतात. "तुम्हाला आत्मा आहे का?' हा प्रश्नच मुळी असंबध्द आहे. मी देह आहे आणि आत्मा ही एक माझी वस्तू आहे, असे "तुम्हाला आत्मा आहे का?' या प्रश्नाने ध्वनीत करणे, हे किती मूर्खपणाचे आहे! मी आत्मा आहे, शरीर माझे आहे, सर्व जग माझे आहे. तुम्ही ईश्वराला मानता का? ईश्वरावर तुमचा विश्वास आहे का? असा दुसऱ्या एकाने "रामा'स प्रश्न केला. "राम' म्हणतो- मी ईश्वराला जाणतो. पण विश्वास म्हटला म्हणजे, जी गोष्ट आपणाला माहीत नाही किंवा जी गोष्ट आमच्यावर लादलेली असते, तिच्यावर ठेवावयाचा. आता "मी ईश्वराला जाणतो', "मी ईश्वर आहे' असे म्हटल्यावर ईश्वरावर तुमचा विश्वास आहे काय, या प्रश्नात अर्थ काय राहिला?
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: