Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

स्वाभाविक म्हणजे काय?
ऐक्य समूह
Saturday, August 28, 2010 AT 12:06 AM (IST)
Tags: vachnamrut
"स्वाभाविक' या शब्दाविषयी हजारो लोकांचा गैरसमज झालेला आहे. या शब्दाच्या नावाखाली अनेक दुर्गुणांना व पापांना आश्रय व उत्तेजन मिळत आहे. याकरिता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे. मनामध्ये येणाऱ्या सर्व कामना, वासना, पशुवृत्ती या "स्वाभाविक' आहेत. आमच्या मनाला दाबून ठेवणारे लगाम सैल करा, वासनारुपी अश्वांना यथेच्छ मोकळे सोडा, आम्ही स्वतंत्र होऊ या असे काही लोक म्हणतात. त्यांची ही स्वतंत्रता म्हणजे, पशुवृत्तीचे जीवन होय.
लहान मुलांचा खेळ-कृत्रिम आगगाडी घ्या आणि तिला चावी देऊन सोडा, म्हणजे ती काही काळ धावू लागते. तिला गती मिळाल्यामुळे, स्थितीसातत्याच्या नियमाप्रमाणे तिने काही अंतर जाणे हे स्वाभाविक आहे. या नियमाप्रमाणे दगड हवेत फेकला तर तो वरवर जाणार आणि मुलांचा भोवरा फिरविला असता तो जमिनीवर फिरत राहणार. त्याप्रमाणे तुम्ही पूर्वजन्मी पशूच्या देहात असताना एकाच दिशेने-पशुवृत्ती तृप्त करुन घेण्याच्या दिशेने धावत होता. त्या देहामध्ये तुम्ही जी कृत्ये करीत  होता ती त्या काळी तुम्हाला योग्य होती, कारण त्यायोगे तुमची उन्नती होत होती. यास्तव कुत्रा कुत्र्याप्रमाणे वागतो, डुक्कर डुकराप्रमाणे करतो, म्हणून त्यांना दोष देऊ नका किंवा पापी म्हणू नका.
पशूंचा देह सोडून तुम्ही जेव्हा मानवी देहात आला, तेव्हा पूर्व सवयीमुळे काही पशुवृत्ती असणे हे स्वाभाविक आहे. पशुवृत्ती किंवा ऐहिक वासना हे पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे. यावरुन "स्वाभाविक' या शब्दाने स्थितीसातत्याच्या पूर्वगतीचा किंवा गतस्थितीचा बोध होतो. पण, याने तुमच्या खऱ्या स्वरुपाचा म्हणजे आत्म्याचा बोध होत नाही. स्थितीसातत्याच्या नियमाला जिंकून आम्ही पुढे गेलो म्हणजे, आम्ही "खरे मनुष्य' या पदवीला प्राप्त होतो. पशुवृत्ती, या पशूंना, आणि पशूंचे देह सोडून नुकत्याच मानवी देहात आलेल्या व्यक्तींना योग्य आहेत.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: