Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुईंज सोसायटी व देशभक्त आबासाहेब वीर पतसंस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरल्या
ऐक्य समूह
Friday, August 20, 2010 AT 12:29 AM (IST)
भुईंज, दि. 19 : भुईंज विकास सोसायटी आणि देशभक्त आबासाहेब वीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थांच्या संचालकांच्या नियोजनबध्द कारभारामुळेच या दोन्ही संस्थांनी सभासदांचा विश्वास जिंकला आहे. या संस्थांचा उंचावणारा आलेख जिल्ह्यातील इतर संस्थांनासुध्दा आदर्शवत असल्याचे प्रतिपादन किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केले.
येथील भुईंज विकास सोसायटी व देशभक्त आबासाहेब वीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन मदन रामचंद्र भोसले, पतसंस्थेचे चेअरमन विलासभाऊ जाधवराव, व्हाईस चेअरमन पांडुरंग शेवते, सुनील शिंदे, शेखर भोसले-पाटील, भुईंजचे सरपंच अर्जुन भोसले,  उपसरपंच सूर्यवंशी, राजेश कांबळे उपस्थित होते. भोसले म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात 941 विकास सोसायट्या आहेत. त्यामध्ये भुईंज सोसायटीचा 3 रा नंबर लागतो. लवकरच ही सोसायटी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल याची सर्वांना खात्री आहे. आबासाहेब वीर पतसंस्थेने सुध्दा सर्वसामान्य सभासदांची आर्थिक निकड पूर्ण केल्याने संस्थेने सभासदांचा विश्वास जिंकला आहे. या दोन्ही संस्थांच्या संचालकांच्या नियोजनबध्द कारभारामुळेच या संस्था जिल्ह्यातील आदर्शवत संस्था झाल्या आहेत. दोन्ही संस्थांनी नवनवीन उद्योगांना चालना देवून सुशिक्षित बेरोजगारांना मदत करावी.
यावेळी विलासभाऊ जाधव याचे भाषण झाले. सोसायटीचे चेअरमन मदन भोसले यांनी संस्थेचा
मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. सचिव लक्ष्मण जाधव व संजय शिंदे यांनी अहवाल वाचन केले.
अंकुश शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. गणपतराव धुरगुडे यांनी आभार मानले. सभेत तेजस्वीनी सावंत हिच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. एरंडे यांना यावेळी पन्नास हजाराच्या अपघात विम्याचा धनादेश देण्यात आला.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: