युसूफ बागवान यांना राष्ट्रपती पदक जाहीर
ऐक्य समूह
Friday, August 20, 2010 AT 12:27 AM (IST)
सातारा, दि. 19 : येथील रहिवासी व सध्या विरार पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदावर कार्यरत असलेले युसूफ बागवान यांना पोलीस खात्यातील सर्वोच्च असा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.
बागवान यांनी यापूर्वी कोल्हापूर एल. सी. बी., लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर, अंबरनाथ, भिवंडी, सिंधूदुर्ग जिल्हा येथे उल्लेखनीय सेवा केली आहे. यापूर्वी त्यांना महसूलमंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.