Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"सत्यम'चे राजू यांना जामीन
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:51 AM (IST)
हैद्राबाद, दि. 18 (वृत्तसंस्था) : सत्यम कॉम्प्युटर्समधील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने यातील मुख्य आरोपी बी. रामलिंग राजू यांना जामीन मंजूर केला. प्रकृतीच्या कारणांमुळे राजू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. राजू यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात यावे,     अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील हरिन रावळ यांनी न्यायालयाकडे केली. गेल्या सप्टेंबरपासून प्रकृतीचे कारण देऊन राजू वारंवार न्यायालयीन प्रक्रिया टाळत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. राजू यांच्या प्रकृतीबाबत निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालावरही त्यांनी शंका व्यक्त केली. सत्यम गैरव्यवहार प्रकरणातील अन्य नऊ आरोपींना न्यायालयाने याआधीच जामीन मंजूर केला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: