Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शाळेची इमारत कोसळून 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:50 AM (IST)
कापकोट, दि. 18 (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधीलकापकोट येथे ढगफुटीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 मुलांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही मुले सापडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शाळेची इमारत कोसळली तेव्हा शाळेत किती विद्यार्थी उपस्थित होते, यांची माहिती मिळू शकली नाही. कापकोट भागातील सरस्वती शिशु मंदिर शाळेची ही इमारत आहे. डोंगराळ भागात ही शाळा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: