आयसीसी पुरस्कारांसाठी सचिन, धोनी आणि सेहवागला नामांकने
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:07 AM (IST)
दुबई, दि. 18 (वृत्तसंस्था) : एलजी आयसीसी पुरस्कार 2010 ची घोषणा 6 ऑक्टोबर रोजी बंगलोर येथे होणार असून त्यासाठी निवडण्यात आलेल्या 8 खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना नामांकने देण्यात आली आहेत. चार संघांच्या आठ खेळाडूंना तीन-तीन वर्गामध्ये सहभागी करण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, जॅक कॅलिस, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, डग बोलिंजर आणि श्रीलंकेचा महेला जयवर्धने यांनाही नामांकने देण्यात आली आहेत.