मुंबईतील रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मनमानी विरुध्द मनसे सिध्द
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:53 AM (IST)
मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : "कायदा मोडणाऱ्यांनाच आम्ही मोडतो', अशी गर्जना करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शहरांमधील रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे नवी "धडक' मोहीम राबवणार असल्याची घोषणा केली. मनसे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवते, असे संकेत देत राज ठाकरे यांनी सरकारला चपराक लगावली आहे.