Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाचे कडक कायदे
aikya group
Friday, July 30, 2010 AT 01:53 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 29 : गर्भलिंग चाचणीचा प्रयोग कोणीही करू नये. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासन कडक कायदे करीत आहे, असे प्रतिपादन डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले.
दलित महिला विकास मंडळ व सातारा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यामाने लेक लाडकी अभियानांतर्गत पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके, जिल्हा माहिती अधिकारी माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, सुचेता मुळे, डॉ. जयंत देशपांडे, डॉ. वैशाली सप्रे उपस्थित होत्या.
डॉ. जगदाळे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक सोनोग्राफी मशीनच्या बाबतीत सर्व माहिती ठेवली जात आहे. रजिस्टर तपासले जात आहेत. 10 स्टिंग ऑपरेशन करून जिल्ह्यातील चार डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डॉ. भगवान पवार म्हणाले, पर्यावरणाच्या समतोलाबरोबर सामाजिक समतोलही ढासळत आहे. यासाठी समाज जागृती करण्याबरोबरच नवविवाहित दांपत्यांचे मेळावे घेऊन समुपदेशन करणे आवश्यक आहे.
डॉ. जयंत देशपांडे यांनी गर्भलिंग चाचणी व स्टिंग ऑपरेशनसंदर्भात माहिती दिली. कार्यशाळेचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते "लेक झाली हो' गीत म्हणून पाळणा हलवून करण्यात आली. कैलास जाधव यांनी स्वागत केले. समारोपप्रसंगी लेक लाडकी अभियानांतर्गत समाजप्रबोधन करणारे गोंधळी गीत सादर करण्यात आले. पत्रकार संघाचे विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले. गजानन चेणगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पत्रकार उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: