स्वाईन फ्ल्यूचे सांगलीत 11 रुग्ण
aikya group
Friday, July 30, 2010 AT 02:26 AM (IST)
सांगली, दि. 29 (प्रतिनिधी) : सांगली शहर आणि परिसरात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढल्यामुळेजिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूसाठी विशेष उपचार विभाग गुरुवारी सुरू करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 11 जणांना स्वाईन फ्ल्यूची बाधा झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबई, पुण्याशी अलिकडच्या काळात संपर्क नसलेल्या रुग्णांचा यामध्ये समावेश असल्यामुळे या रोगाचा धोका वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आतापर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून दीड हजार जणांना स्वाईन फ्ल्यूवर गुणकारी असलेल्या टॅमी फ्ल्यू गोळ्यांचा डोसही देण्यात आला आहे.