महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदांचे अर्ज स्वीकारण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
aikya group
Friday, July 30, 2010 AT 02:04 AM (IST)
सातारा, दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 1 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अधिक्षक, सांख्यिकी अधिकारी या पदांचे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 30 जुलै 2010 असा आहे. परंतु संबंधित पोस्ट कार्यालयातील लाल रंगाच्या माहिती पुस्तिकांचा तुटवडा लक्षात घेता सदर पदांचे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 20 ऑगस्ट 2010 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.