40 वर्षांत लोकसंख्या 50 कोटींनी वाढणार
PTI ---
Friday, July 30, 2010 AT 02:53 AM (IST)
वॉशिंग्टन, दि. 29 (वृत्तसंस्था) :येत्या 40 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 170 कोटी होण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेतल्या लोकसंख्या विशेष तज्ज्ञांनी गुरुवारी केला आहे. सध्या जगाची लोकसंख्या 608 कोटी आहे आणि त्यात चीनची लोकसंख्या 130 कोटी तर भारताची 120 कोटी आहे. अमेरिकन पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरोच्या अहवाला नुसार येत्या 40 वर्षांत आफ्रिका खंडातील लोकसंख्या वेगाने वाढेल आणि 2050 मध्ये ती दुप्पट म्हणजे 201 कोटी होईल. तर रशिया आणि पूर्व युरोपमधील घटता जन्मदर लक्षात घेता, ही लोकसंख्या आणखी 40 वर्षांनी 3 कोटींनी कमी होईल, असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.