Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तानात विमान कोसळून 158 ठार
PTI ---
Thursday, July 29, 2010 AT 02:57 AM (IST)
Tags: national

इस्लामाबाद, दि. 28 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळ मरगल्ला डोंगर पठारावर आज बुधवारी एका खासगी विमान कंपनीचे प्रवासी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात विमानातील 152 प्रवासी आणि 6 कर्मचारी असे सर्वच 158 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
हे विमान तुर्कस्तानहून कराची मार्गे इस्लामाबादला जात होते. सकाळी 7.30 वाजता ते कराचीहून निघाले होते. आतापर्यंत 100 हून अधिक मृतदेह शोधून काढले असून विमानातील सर्वच प्रवासी व कर्मचारी मृत्युमुखी पडल्याचे मानले जात आहे.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: