Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ना. अजित पवार, ना. रामराजे, आ. विनायकराव मेटे, आ. प्रकाश बिनसाळे यांचा गुरुवारी फलटण येथे नागरी सत्कार
aikya group
Tuesday, July 27, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: regional,  
फलटण, दि. 26 : उत्तम प्रशासक आणि संघटक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त, राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा, विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आ. विनायकराव मेटे व आ. प्रकाश बिनसाळे यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन येथील मुधोजी क्लबच्या प्रशस्त मैदानावर गुरुवार, दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्या हस्ते ना. अजित पवार यांचा आणि ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ विनायकराव मेटे व आ. प्रकाश बिनसाळे यांचा सत्कार ना. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास माजी खा. लक्ष्मणराव पाटील, माजी मंत्री आ. विक्रमसिंह पाटणकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर, आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी आ. सदाशिवराव पोळ, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती ऍड. भास्करराव गुंडगे, समाजकल्याण समितीचे सभापती अशोकराव खरात, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. जयश्री भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, उद्योगपती श्रीमंत बंटीराजे  खर्डेकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, न्यू फलटण शुगर वर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंखे (पाटील), चेअरमन हंबीरराव भोसले, जिल्हा बॅंकेचे संचालक विश्वासराव निंबाळकर, पंचायत समितीमधील राष्ट्रवादीचे गटनेते श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उद्योगपती व ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, पंचायत समितीचे सभापती रामभाऊ ढेकळे, नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनराज नाईक निंबाळकर, महानंदच्या संचालिका सौ. कौशल्या पवार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर, श्रीराम बझारचे चेअरमन महादेवराव पवार, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन यशवंतराव रणवरे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन लक्ष्मणराव जाधव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. उज्ज्वला शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. फलटण शहर व तालुक्यातील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंगे्रसचे तालुकाध्यक्ष सुभाषराव धुमाळ, शहराध्यक्ष ऍड. केशवराव भगत, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. राजश्री शिंदे, शहराध्यक्षा सौ. मेघा सहस्त्रबुध्दे, प्रदेश प्रतिनिधी सौ. लतिका अनपट यांनी केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: