Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

प्रत्येकजण बाळगतो मीपणा
aikya group
Tuesday, July 27, 2010 AT 12:08 AM (IST)
Tags: Vachanamrut,  

टेलिफोनद्वारा मनमोहनाने प्रेमसंवाद केला. टेलिफोन गोड वाटला. मनमोहन दूर होता तोपर्यंत टेलिफोनची किंमत होती. परंतु मनमोहन आता घरी आल्यावर त्या टेलिफोनचे काय काम? आपले इष्टमित्र, स्नेहीसंबंधी, राजेरजवाडे, धनदौलत हे सर्व टेलिफोन असून त्याच्या द्वारा राम आमच्याशी बोलत होता. जोपर्यंत रामाची भेट नव्हती तोपर्यंत मन कापत होते आणि टेलिफोनशिवाय कसे चालेल असे वाटत होते. आता माझा प्यारा राम घरी आला व कडकडून भेटला. मित्रांनो, तुम्ही मला आता सोडा. आप्तेष्टांनो, मला टाकून चला. धनदौलत लुटली जावो. मानसन्मान, तुम्ही पाठमोरे व्हा. आता येथे तुमचा काय उपयोग? राजाजी, मला हद्दपार करा, आणि आपले जग आपल्या घरी ठेवा.
राजा रुठे नगरी राखे अपनी।
मैं हर रुठे कहां जाना?।।
अर्थ : राजा रुसला तर आपली नगरी राखून बसेल. पण हरि रुसला तर मी कुठे जाऊ?
अब दिलबर घर आया है। नैनोंका फर्श बिछाऊंगी।
गुण औगुण पर धर चिन्गारी। यह मैं धूप धुकाऊंगी।
प्राणों का मैं सेज करुंगी। हरि को गले लगाऊंगी।।
अर्थ : आता मोहन घरी आला आहे. त्याच्या-करिता नेत्रांचा गालिचा अंथरीन, गुणावगुणांवर निखारा ठेवून त्याचा धूप दाखवीन, प्राणांची शेज करीन आणि गळ्यात गळा घालून हरिला भेटीन.
अद्वैत दृष्टीशिवाय संशुध्दी नाही
द्वैती असो अद्वैती असो, भक्त असो, कर्मकांडी असो, हिंदू असो अगर दुसरा कोणी असो, सर्वच "शिवाऽहम्‌' असे म्हणतात. सर्वात मोठा मी, असे प्रत्येकाला अंत:करणापासून वाटत असते, आणि तसे तो कृतीने दाखवीत असतो. जो द्वैती नुकताच देवालयात देवासमोर "मी नीच, पापी, अधम आहे' अशी एकसारखी संथा गात होता त्याला बाहेर बाजारात येऊ द्या आणि मग त्याला कोणी "अरे हे नीचा' असे पुकारु द्या. म्हणजे काय तमाशा होतो ते पहा!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: