Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड लायन्स क्लबची उल्लेखनीय समाजसेवा
aikya group
Monday, July 26, 2010 AT 11:24 PM (IST)
Tags: regional,  
कराड, दि. 26 : लायन्स क्लब ऑफ कराडने 1966 पासून उल्लेखनीय समाजसेवा केली आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत या क्लबचे सेवाकार्य पोहोचत असून शासन दरबारीही कार्याची
नोंद झाली आहे. सध्या लायन्स आरोग्य सेवा संकुलानातून जे काम सुरु आहे, त्यामुळे समाजाचाही क्लबकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल प्रा. डॉ. राजेंद्रभाई शहा यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ कराडच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. पुढील वर्षासाठी समीर जोशी यांना अध्यक्षपदाची, प्रसाद आगरकर यांना सचिवपदाची
व संदीप तलाठी यांना खजिनदारपदाची सूत्रे
सोपवण्यात आली. त्याचबरोबर संचालक मंडळाचाही शपथविधी करण्यात आला.
लायनसेस क्लबच्या अध्यक्ष-पदाची सौ.मानसी जोशी, सचिवपदाची सौ. निर्मला काळे, खजिनदारपदाची सौ.मनाली शिंदे यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली. तत्पूर्वी सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील कै. चि. रोहित खोचीकर स्मृती लायन्स गार्डनचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले.
नईम कागदी, सौ.सोनल भोसेकर यांनी सूत्रसंचालन केले. नूतन सचिव प्रसाद आगरकर यांनी आभार मानले. यावेळी रिजन चेअरमन जगदीश पुरोहित, झोन चेअरमन धैर्यशील भोसले, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, चेअरमन सुभाषराव एरम, सातारा, कराड, फलटण येथील लायन्सचे पदाधिकारी व सदस्य, लायनेस क्लबच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: