Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष  >>  बातम्या

कराटे स्पर्धेत "व्यंकटलक्ष्मी'च्या विद्यार्थ्यांचे यश
aikya group
Tuesday, March 23, 2010 AT 02:09 AM (IST)
Tags: sports
सातारा, दि. 22 : सदरबझार येथील संगम मल्टिपर्पज हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय काता व कुमिते कराटे स्पर्धेत व्यंकटलक्ष्मी मल्टिपर्पज हॉलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
या स्पर्धेत निखिल जाधव व आयुष फरांदे यांनी सुवर्णपदक तर विशाखा जाधव हिने कांस्यपदक मिळवले. अजय शिंदे, साहिल लोखंडे व इरफान मोमीन हे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
या यशाबद्दल खेळाडूंचे नगरसेवक जयवंत भोसले, वसुंधरा पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र भोसले, उपसरपंच मोहन सूर्यवंशी, जपान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र परदेशी व व्यंकटलक्ष्मी हॉलचे प्रशिक्षक बाळकृष्ण नाईक यांनी अभिनंदन केले. कराटे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाळकृष्ण नाईक, मोबा. 9850120217 वर संपर्क साधावा.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: