Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष  >>  बातम्या

राजगुरु कोचळे गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित
aikya group
Monday, March 22, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: sports
वाई, दि. 22 ः मांढरदेव (वाई) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील क्रीडा शिक्षक राजगुरु कोचळे यांना आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्यावतीने यशवंतराव चव्हाण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार नुकताच देण्यात आला.
यावेळी आ. विलासराव उंडाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती ऍड. भास्करराव गुंडगे, नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते. मांढरदेवसारख्या गावातून अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे काम कोचळे यांनी केले आहे. विद्यालयाच्या 15 ऍथलिट्‌सनी राष्ट्रीय स्पर्धेत तर 40 खेळाडूंनी राज्य स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामधील कालिदास हिरवे, संध्या पारटे, जनाबाई हिरवे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत. क्रीडा क्षेत्रातल्या या कार्याबद्दल जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचा 2009-10 सालचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार त्यांना देण्यात आला.
त्याबद्दल त्यांचे काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, उपाध्यक्ष सुखदेव मांढरे, सचिव तात्याबा मांढरे, संचालक किसन मांढरे, धर्माजी मांढरे, मारुती मांढरे, शामराव मांढरे, रघुनाथ मांढरे, मुख्याध्यापक प्रकाश गायकवाड आदींनी अभिनंदन केले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: