अंबवडे येथे बुधवारी बैलगाड्यांची शर्यत
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:43 AM (IST)
निमसोड, दि. 12 : अंबवडे, ता. खटाव येथे भूतोबा यात्रेनिमित्त दि. 17 रोजी बैलगाड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
विजेत्यांना 11 हजार 1 रुपये, 7 हजार 1 रुपये, 4 हजार 1 रुपये, 2 हजार 501 रुपये व 1 हजार 1 रुपयांची रोख बक्षिसे तसेच ढाल व मानाचे फेटे देण्यात येणार आहेत. या शिवाय यात्रेनिमित्त दि. 15 रोजी देवाची पालखी, दि. 16 रोजी मानपानाचे बैलाचे गाडे, दि. 18 रोजी गजीनृत्य स्पर्धा होणार आहेत. गजीनृत्य स्पर्धेत विरकरवाडी, गंगोती, अंबवडे, कुरोली, गोरडवाडी, दोरगेवाडी येथील नामवंत गजीवाहक सहभागी होणार आहेत.