यशवंतराव चव्हाण यांना वाहिली विद्यार्थ्यांनी शब्दसुरांची आदरांजली
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:54 AM (IST)
कराड, दि. 12 : आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने आज सकाळी 8.30 वाजता आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व कराड नगरीचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 97 व्या जयंतीदिनी त्यांच्या येथील समाधीस्थळी शहरातील 11 माध्यमिक शाळांमधील सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांनी शब्दसुरांची भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमे दे ना दाता... प्रार्थना, देशभक्तीपर गीते व राष्ट्रगीत सादर केले. तसेच संगीत शिक्षक-शिक्षिका आणि यशवंत प्रेमींनी तानाजी जाधव यांनी रचलेले व सुहास चव्हाण यांनी स्वरबध्द केलेले महाराष्ट्राच्या यशवंताला, प्रणाम करुया त्रिवार... हे यशवंत गौरव गीत सादर केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. विलासराव पाटील-उंडाळकर, व्ही. आय. टी. पुणेचे निदेशक डॉ. एच. के. अभ्यंकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, नगराध्यक्षा सौ. शारदा जाधव, उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रा. गो. प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशबापू पाटील, सुनील पवार, ऍड. मानसिंगराव पाटील, मोहनराव डकरे, नगरपालिकेचे अभियंता ए. एन. मुल्ला, प्रा. सुरेश माळी, आजी-माजी नगरसेवक, प्रतिष्ठानचे विश्वस्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सचिव आनंदराव साळुंखे, प्रा. रामभाऊ कणसे, संभाजीराव पाटील, पी. एस. पाटील, सुहेर बारस्कर, अबुबकर सुतार, प्रा. एस. ए. डांगे यांनी परिश्रम घेतले.