Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकचा टी-20 संघ जाहीर; कर्णधाराविषयी मौन
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:48 AM (IST)
Tags: sports
कराची, दि. 12 (वृत्तसंस्था) : पाकच्या राष्ट्रीय निवड समितीने एप्रिल-मे दरम्यान कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या ट्‌वेंटी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम 15 जणांचा चमू शुक्रवारी जाहीर केला. मात्र या संघाच्या कर्णधारपदी कोणाचीही नेमणूक पीसीबीने जाहीर केली नाही.
चौकशी समितीच्या शिफारशीनुसार उमेदवारीचा काळ भोगत असलेल्या शाहीद आफ्रिदी, कामरान अकमल व उमर अकमल या त्रिकुटाचा संघात समावेश करण्यात आला आहे. निवडकर्त्यांनी 19 वर्षांखालील विश्वचषक संघातील  अष्टपैलू हम्माद आझम याची निवड केली असून मोहम्मद हफीज व मिसबाह-उल-हक यांना पुनरागमनाची संधी दिली. संघाच्या कर्णधारपदी  अष्टपैलू अब्दुल रझ्झाक किंवा सलामीचा फलंदाज सलमान बट्ट यांच्यापैकी एकाची निवड केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संघ : मोहम्मद हफीज, सलमान बट्ट, खालिद लतिफ, मिसबाह-उल-हक, शाहीद आफ्रिदी, फवाद आलम, उमर अकमल, अब्दुल रझ्झाक, यासिर अराफत, कामरान अकमल, सईद अजमल, मोहम्मद असिफ, मोहम्मद आमेर, उमर गुल, हम्माद आझम. राखीव : मोहम्मद सामी, सर्फराझ अहमद, नावेद यासिन, रझा हसन व शाहझेब हसन.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: