Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष रहावे
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:22 AM (IST)
Tags: local news
पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष रहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले आहे. किमान तापमान, सकाळी आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यामध्ये असंतुलन झाल्यास हवामानात बदल जाणवतो. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळेमार्च महिन्यात यावर्षी पाऊस पडू लागला आहे. तापमानाच्या वाढीमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्याच भागात पाऊस पडतो, असेही त्यांनी सांगितले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: