Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिबट्याचा आंबवडेत धुमाकूळ दोन शेळ्यांचा फडशा
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:35 AM (IST)
Tags: regional
कराड, दि. 12 : पाठरवाडी, डेळेवाडी, गमेवाडी परिसरात धुमाकूळ  घालत असलेल्या बिबट्याने आपला मोर्चा आंबवडे, ता. कराड परिसरात वळवला आहे. गुरुवारी रात्री त्याने आंबवडेतील भिकाजी कृष्णा शेवाळे यांच्या दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यामुळे कोळे, विंग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत महिन्यापासून गमेवाडी, डेळेवाडी व पाठरवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन ग्रामस्थांसह एका युवकावर याच परिसरात हल्ला केला. दरम्यान, 3 वर्षापासून सुमारे 30 ते 40 पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. गत तीन आठवड्यापासून त्याला पकडण्यासाठी डेळेवाडी व गमेवाडी परिसरात सापळा लावण्यात आला आहे. मात्र त्याने चार दिवसांपासून सापळ्यातीलच शेळी फस्त करुन वनविभागालाच आव्हान दिले आहे.दरम्यान, गुरुवारी रात्री आंबवडे येथील भिकाजी कृष्णा शेवाळे यांच्या घरामागील शेडातील दोन शेळ्यांना बिबट्याने फस्त केले. यामुळे आंबवडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: