मोदी विशेष चौकशी पथकासमोर हजर होणार
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:57 AM (IST)
अहमदाबाद, दि. 12 (वृत्तसंस्था) : 2002 मधल्या गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केेलेल्या विशेष चौकशी पथकासमोर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हजर होणार असल्याचे सरकारी प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले.
मोदी यांना आपल्यासमोर हजर राहण्याचे समन्स चौकशी पथकाने बजावले आहे.
मोदी यांनी चौकशी पथकाला पूर्णपणे सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे.